
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातील काही नियम देखील बदलतात. आज 1 मार्चपासून अनेक नियम बदलत आहेत. ज्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत आणि बँक एफडीच्या व्याजदरात बदल दिसून आले आहेत. मार्च महिन्यात कोणते बदल झाले आहेत आणि त्याचा लोकांच्या खिशावर काय परिणाम होईल जाणून घ्या.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ
आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर 6 रुपयांनी महाग झाला आहे. आजपासून 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 6 रुपयांनी महाग झाला आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 5.50 रुपयांनी वाढली आहे. म्हणजे मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर 1749 रुपयांवरून 1755.50 रुपयांवर गेली आहे. दिल्लीत त्याची किंमत 6 रुपयांनी वाढून 1803 रुये झाली. पूर्वी हे दर 1797 रुपये होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एअर टर्बाइन इंधनाच्या किमतींमध्ये बदल
एटीएफच्या किमतींमध्येही बदल झाले आहेत. याचा थेट परिणाम हवाई प्रवाशांवर होणार आहे. तेल वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एअर टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किमती बदलतात. जर ATF ची किंमत कमी झाली तर विमान कंपन्या त्यांचे भाडे कमी करू शकतात, तर इंधनाची किंमत वाढल्यास भाडे वाढू शकते.
UPI द्वारे विमा प्रीमियम भरणे झाले सोपे
UPI द्वारे विमा प्रीमियम भरणे आजपासून सोपे झाले आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहारांमध्ये मोठा बदल झाला आहे. IRDAI च्या नवीन नियमांनुसार, आता UPI द्वारे विमा प्रीमियम भरणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. IRDAI ने UPI द्वारे विमा-ASBA नावाची एक नवीन सुविधा सुरू केली आहे. ज्याचा उद्देश ग्राहकांसाठी पेमेंट प्रक्रिया सोपी करणे आहे. याद्वारे, पॉलिसीधारक प्रीमियम पेमेंटसाठी त्यांच्या बँक खात्यात पैसे ब्लॉक करू शकतात. परिपत्रकानुसार, नवीन पेमेंट सिस्टम 1 मार्चपासून लागू झाली आहे.
(नक्की वाचा- Pune Swargate Bus Depot Case : शेकडो पोलिसांची फौज, श्वान पथक, ड्रोन... दत्तात्रय गाडे पोलिसांना कसा सापडला?)
मुदत ठेवीच्या (FD) व्याजदरात बदल
मार्च 2025 पासून मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल होऊ शकतो. बँका एफडीवरील व्याजदर कमी किंवा वाढवू शकतात.
म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यात नॉमिनी जोडण्याच्या नियमांमध्ये बदल
बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांच्या नामांकनांशी संबंधित नियम बदलले आहेत. गुंतवणूकदार आता त्यांच्या डीमॅट खात्यांमध्ये किंवा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 10 व्यक्तींना नामांकित करू शकतात. त्यांचा उद्देश हक्क नसलेल्या मालमत्ता कमी करणे आणि गुंतवणुकीचे चांगले व्यवस्थापन करणे आहे.
(नक्की वाचा- नोएडातील न्यूज चॅनलमध्ये IIT बाबाला मारहाण, Video शेअर करत केले अनेक आरोप
UAN अॅक्टिव्हेट करण्याची अंतिम तारीख 15 मार्च
ईपीएफओने चालू आर्थिक वर्षात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) अॅक्टिव्हेट करण्याची आणि बँक खाती आधारशी जोडण्याची अंतिम तारीख 15 मार्चपर्यंत वाढवली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world