जाहिरात

खोपोली ते कुसगाव मिसिंग लिंक प्रकल्पाचे किती काम पूर्ण? उपक्रम समितीने केली पाहाणी

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे घाटमार्ग टाळता येणार आहे.

खोपोली ते कुसगाव मिसिंग लिंक प्रकल्पाचे किती काम पूर्ण? उपक्रम समितीने केली पाहाणी
पुणे:

सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील 'खोपोली ते कुसगाव मिसिंग लिंक' प्रकल्पाचा आढावा घेतला. या भेटीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित होते. यावेळी काम किती पूर्ण झाले आहे. किती बाकी आहे, याची माहिती समितीने यावेळी घेतली. 

नक्की वाचा - Monsoon updates पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट, राज्यात पूरपरिस्थिती गंभीर; कोट्यवधी नागरिकांना सतर्कतेचा संदेश

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे घाटमार्ग टाळता येणार आहे. वाहतुकीतील अडथळा कमी होणार आहे. 9 किमी लांबीचा आणि 23 मीटर रुंदीचा बोगदा देशातील सर्वात मोठ्या बोगद्यांपैकी एक ठरणार आहे. तसेच, या प्रकल्पांतर्गत 185 मीटर उंच पूल बांधण्यात येणार आहे. देशातील सर्वात उंच पूल बांधण्याचा विक्रम महाराष्ट्रात नोंदवला जाणार आहे. हे प्रकल्प आणि पूल पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे प्रवास अधिक सुलभ व आरामदायी होईल.

नक्की वाचा- Pune News: पती पत्नी और वो! नवऱ्याच्या प्रेयसीला पत्नीने पकडलं, भर रस्त्यात अपहरणाचा थरार

महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी समितीला माहिती दिली, की या प्रकल्पाचे 90% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील अभियंते व कामगार हे काम समर्थपणे पूर्ण करत आहेत, समितीने त्यांच्या कार्याचे कौतुक केले.समितीच्या सदस्यांमध्ये समिती प्रमुख आमदार राहुल कुल यांच्यासह आमदारसुभाष देशमुख, आमदार नीलेश राणे,आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत ओगले, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार वरुण सरदेसाई, आमदार रईस शेख यांचा यात समावेश होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com