जाहिरात

HSRP Number Plate Last Date: 'एचएसआरपी'साठीची मुदत उद्या संपणार, नसल्यास 10 हजार रुपये दंड; मुदतवाढीची मागणी

HSRP Number Plate Deadline: आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीतून सिंधुदुर्ग (33%) हा जिल्हा HSRP प्लेट्स बसवण्यात राज्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

HSRP Number Plate Last Date: 'एचएसआरपी'साठीची मुदत उद्या संपणार, नसल्यास 10 हजार रुपये दंड; मुदतवाढीची मागणी
मुंबई:

राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट  (HSRP) प्लेट्स बसवण्यासाठीची अंतिम मुदत 15 ऑगस्ट, 2025 रोजी संपत आहे. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 70% जुन्या वाहनांवर (High security number plate Maharashtra) अजूनही या प्लेट्स बसवलेल्या नाहीत. यामुळे मुदतीनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना ₹10,000 पर्यंत दंड (HSRP fine Maharashtra)  भरावा लागू शकतो. वाहनधारकांना HSRP नंबरप्लेट बसविण्याची इच्छा असली तरी तांत्रिक अडचणींमुळे आणि किचकट प्रक्रियेमुळे त्या बसविण्यात त्यांना अडचणी येत आहेत. 

( नक्की वाचा: जुन्या वाहनांसाठी HSRP प्लेट लावण्यासाठी महाराष्ट्रासह 20 राज्यांमध्ये हे दर निश्चित  )

HSRP नंबरप्लेट कोणत्या वाहनांना बसवणे बंधनकारक आहे?

केंद्र सरकारने 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी HSRP प्लेट्स अनिवार्य केल्या आहेत. 1 जानेवारी 2025 पासून ही मोहीम सुरू झाली असून, परिवहन विभागाने आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिला आहे. गेल्या सात महिन्यांत केवळ 19.57% वाहनांवरच HSRP प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी नुकतीच पुणे येथे राज्यभरातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जनजागृती आणि फिटमेंट सेंटर वाढवण्यावर भर देण्यास सांगितले आहे. ज्या वाहनांवर ही नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे त्यांची संख्या अजूनही मोठी असून पुन्हा एकदा मुदतवाढ मिळावी यासाठी मागणी केली जात आहे.  यापूर्वी मुदतवाढ देत असताना ही अंतिम मुदतवाढ असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे ज्या वाहनांवर ही नंबरप्लेट बसविण्यात आलेली नाही ते वाहनचालक चिंतेत पडले आहेत. 

( नक्की वाचा: सावधान! HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करायला जाल आणि डोक्याला हात मारुन घ्याल )

आतापर्यंत किती वाहनांना HSRP नंबरप्लेट लावण्यात आल्या आहेत?

  • एकूण जुनी वाहने (1 एप्रिल 2019 पूर्वी): 2,54,90,159
  • HSRP प्लेट्स बसवलेली वाहने: 4,989,656 (19.57%)
  • नोंदणी केलेली वाहने (प्लेट्स बसवणे बाकी): अंदाजे 10%
  • नोंदणी न केलेली वाहने: अंदाजे 70%

दंड आणि कारवाईची भीती

आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीतून सिंधुदुर्ग (33%) हा जिल्हा HSRP प्लेट्स बसवण्यात राज्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. त्याखालोखाल वर्धा, नागपूर ग्रामीण, सातारा आणि गडचिरोली जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.  राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीची एकूण 2,54,90,159 जुनी वाहने आहेत. यापैकी 4,989,656 वाहनांनाच HSRP बसवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सुमारे 10% वाहनधारकांनी प्लेट्ससाठी नोंदणी केली आहे, परंतु अजून त्यांना त्या बसवून घ्यायच्या आहेत. उर्वरित सुमारे 70% वाहनांनी अद्याप नोंदणी केलेली नाही.  ज्या वाहनधारकांनी 15 ऑगस्टपूर्वी नोंदणी केली आहे, परंतु त्यांना 15 ऑगस्टनंतरची अपॉइंटमेंट मिळाली आहे, त्यांच्यावर कारवाई होणार नाही.  

( नक्की वाचा: हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य का आहे? फायदे समजून घ्या )

HSRP प्लेट्स कशी मिळवायची?

HSRP प्लेट्स मिळवण्यासाठी, वाहनधारकांनी अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये वाहनाचे RC (नोंदणी प्रमाणपत्र) क्रमांक, जवळचे फिटमेंट सेंटर निवडणे, आवश्यक शुल्क भरणे आणि अपॉइंटमेंट बुक करणे यांसारख्या गोष्टी कराव्या लागतात. ठरलेल्या तारखेला नेमून दिलेल्या केंद्रावर जाऊन प्लेट्स बसवून घेणे बंधनकारक आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com