IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. मागील वर्षीच त्यांची कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून बदली झाली होती. त्यानतंर आता त्यांची विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांची 19 वर्षांच्या कारकीर्दितील 22 वी बदली आहे.
(नक्की वाचा - मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकार अॅक्शन मोडवर, घेणार मोठा निर्णय?)
IAS तुकाराम मुंढे कारकीर्द
- ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
- सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
- जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
- मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग.
- जुलै 2009 - सीईओ, वाशिम.
- जून 2010 - सीईओ, कल्याण.
- जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना.
- सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
- नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी.
- मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
- मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
- फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका.
- नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन.
- डिसेंबर 2018 - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
- जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका.
- ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
- जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
- सप्टेंबर 2022 - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
- एप्रिल 2023 - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
- जून 2023 - सचिव मराठी भाषा विभाग
- जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव