जाहिरात
This Article is From Jun 03, 2024

धक्कादादायक! IAS ऑफिसरच्या मुलीनं 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन संपवलं आयुष्य

IAS ऑफिसर विकास आणि राधिका रस्तोगी यांच्या मुलीनं आत्महत्या केली आहे

धक्कादादायक!  IAS ऑफिसरच्या मुलीनं 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन संपवलं आयुष्य
मुंबई:

IAS ऑफिसर विकास आणि राधिका रस्तोगी यांच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. लिपी (वय 27) असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. लिपीनं त्यांचं मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या सुनिती अपार्टमेंटमधील 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन जीव संपवला. या आत्महत्येनंतर पोलिसांना सुसाईन नोट देखील मिळाली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागाचे तर राधिका रस्तोगी या मुद्रा विभागाच्या सचिव आहेत. 


('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लिपी रस्तोगी हरियाणामधील सोनीपतमध्ये वकिलीचे शिक्षण घेत होती. एलएलबीचे शिक्षण घेणारी लिपी अभ्यासात चांगला परफॉर्मन्स नसल्याने मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांना लिपीची सुसाईड नोट मिळालीय. त्यामध्ये तिच्या मृत्यूचं कारण समोर आलंय.  माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असेही मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिपीनं म्हंटलंय. 

( नक्की वाचा : दुबईला जाण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं! डोंबिवलीत ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू )

लिपीनं पहाटे चार वाजता इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन जीव दिला. तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: