
बाईकवरुन पडल्यानंतर ट्रक अंगावरुन गेल्याने 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली पश्चिम येथील सम्राट चौकात हा अपघात झाला. या घटनेनंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबईच्या अग्निशमन विभागातून निवृत्त झालेल्या सुधीर दाभीलकर हे त्यांच्या पत्नी स्नेहा दाभीलकर यांच्यासोबत दुबईला फिरायला जाणार होते. यासाठी पासपोर्ट काढण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती. पासपोर्ट नुतनीकरणासाठी ते पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यासाठी आले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलीस स्टेशनमधील काम झाल्यानंतर परतत असताना सम्राट चौकाकडे ते वळले. आधी त्यांनी तेथे आपल्या पत्नीसह कलिंगड देखील खाल्ले. त्यानंतर तेथून निघाल्यावर एका कारला ओव्हरटेक करताना जोरात ब्रेक दाबल्याने सुधीर हे पत्नीसह खाली पडले.
( वाचा - 12 वी पास झाल्याचा आनंद, फिरण्यासाठी 'ती' उत्तर भारतात गेली, घात झाला)
त्याचवेळी समोरून एक ट्रक वेगाने येत होता. वेग जास्त असल्याने चालकांना ट्रकवर नियंत्रण मिळवता आले नाही. ट्रक स्नेहा यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
(नक्की वाचा: दंगल फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट)
दाभीलकर दाम्पत्य मोठ्या हौशेने दुबईला जाण्याची तयारी करत होते. मात्र दुबईला जाण्याचे स्नेहा यांचे स्वप्न अधुरेच राहिले. या प्रकरणात विष्णुनगर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world