जाहिरात
Story ProgressBack

भाजपच्या दोन गटात जोरदार राडा, दगडफेक, लाठीचार्ज फोडतोडीने वातावरण तंग

भाजपचेच दोन गट एकमेकां विरोधात ठाकले आहेत. एवढेच नाही तर यांच्यात जोरदार राडाही झाला आहे. त्यात अगदी घोषणाबाजी पासून ते शीवीगाळ होईपर्यंत परिस्थिती आली.

Read Time: 3 mins
भाजपच्या दोन गटात जोरदार राडा, दगडफेक, लाठीचार्ज फोडतोडीने वातावरण तंग
बुलढाणा:

अमोल गावंडे

एकीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपचे कार्यकर्ते दिवसरात्र झटत आहेत. असे देशभर चित्र असले तरी महाराष्ट्रात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. इथे भाजपचेच दोन गट एकमेकां विरोधात ठाकले आहेत. एवढेच नाही तर यांच्यात जोरदार राडाही झाला आहे. त्यात अगदी घोषणाबाजी पासून ते शीवीगाळ होईपर्यंत परिस्थिती आली. त्यानंतर दगडफेक, तोडफोड मग लाठीचार्ज इथं पर्यंत हे प्रकरण चिघळले गेले. हे घडलयं बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणूकीत. या घटने नंतर सर्वच जण चकीत झाले आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बुलढाण्यातील मलकापूर बाजार समितीमध्ये सभापती विरूद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यावेळी भाजपचेच दोन गट एकमेकां समोर उभे ठाकले होते. अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सकाळी अकरा वाजता विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी भाजपचेच असलेले संचेती व तायडे गटाचे समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. संभाव्य संघर्ष लक्षात घेता बाजार समिती परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहनाना आत येण्यास मनाई होती. यावेळी बाजार समिती परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. 

हेही वाचा - गर्लफ्रेंड्सच्या हौसेमौजेसाठी प्रेमवीरांचा खटाटोप, उचललं भलतचं पाऊल, पुढे जे झाले ते...
    
बिहारच्या राजकारणात शोभेल अशा वातावरणात बाजार समितीची सभा झाली. सभेला सुरूवात होताच दोन्ही गट एकमेकां समोर होते. यावेळी दोन्ही गट हमरीतुमरीवर आले. घोषणाबाजी, शिवराळ भाषा याने वातावरण बिघडले.  यावेळी माजी आमदार संचेती यांच्या भावाची कार फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या धुमश्चक्रीत अचानक तुरळक दगडफेक झाली. दंगा नियंत्रण पथक, पोलिसांनी  लाठीमार करीत जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

हेही वाचा - केक भरवण्यावरून वाद, मित्रच मित्राला भिडला; भयंकर शेवट

या घटनेमुळे शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टी मधील गटबाजी, दुफळी, मतभेद पुन्हा पाहायला मिळाले. एक वर्षपूर्वी  मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 सदस्यीय संचालक मंडळाची निवडणूक पार पडली होती. भाजपच्या पॅनेलने 17 जागा जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. सभापतीपदी भाजपचे शिवचंद्र तायडे यांची निवड करण्यात आली. पुढे संचेती व तायडे या दोन्ही नेत्यात बिनसले. रावेर लोकसभा निवडणुकीत हे संबंध विकोपाला गेले. 

हेही वाचा -  वैद्यकीय अधिकारी गायब, कर्मचाऱ्यांना पत्ताच नाही; मृतदेह आढळल्याने खळबळ 

भाजपची  एकहाती वर्चस्व असलेल्या बाजार समितीचे सभापती,भाजप नेते शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात भाजपच्याच 14 संचालकांनी 20  मे रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला. त्या पार्श्वभूमीवर विशेष सभा संपन्न झाली. दरम्यान या गदारोळात सभापती तायडे यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव 13 विरुद्ध 2 असा पारित करण्यात आला. यावेळी 2 संचालक गैरहजर राहिले. एका संचालकाचे निधन झाले आहे. त्यामुळे सध्या 17 संचालक आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
मेगाहाल होणार, आज सीएसएमटी स्थानकातून सुटणार नाही एकही लोकल
भाजपच्या दोन गटात जोरदार राडा, दगडफेक, लाठीचार्ज फोडतोडीने वातावरण तंग
The husband who doubted his wife character was murdered by his wife with an axe an incident in Palghar
Next Article
'राहुल्याची आयटम' म्हणून चिडवणं पडलं महागात, चिडलेल्या बायकोनं धडा शिकवला
;