
- किशोर बेलसरे/ प्रांजल कुलकर्णी नाशिक
नाशिक शहरामध्ये 17 वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पंचवटीतील पेठरोड कर्नल नगर येथील रहिवासी असणाऱ्या आशिष रणमाळेची गुरुवारी (30 मे 2024) रात्री हत्या करण्यात आली. आशिष रणमाळे हा 17 वर्षांचा होता. धक्कादायक बाब म्हणजे आशिषच्याच जवळच्या मित्रांनी त्याची हत्या केल्याचे म्हटले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमके काय होते कारण?
दोन दिवसांपूर्वीच मित्राच्या वाढदिवशी एकमेकांना केक भरवण्याच्या किरकोळ कारणावरून आशिषचे भांडण झाले होते. हाच राग मनात ठेवून तीन अल्पवयीन मित्रांनी धारदार हत्याराने आशिषची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची अधिक तपास केला जात आहे.
(नक्की वाचा: गोळीबारच्या घटनेमुळे भुसावळ हादरलं, माजी नगरसेवकासह दोघांची हत्या)
वडिलांनी पोलिसात केली तक्रार
या प्रकरणी आशिषचे वडील दशरथ रणमाळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दशरथ रणमाळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, "गुरुवारी रात्री माझा मुलगा आशिष पाच मिनिटांत येतो असे सांगून आशिष घराबाहेर पडला. यानंतर मी माझ्या मुलीला त्याला बोलावण्यास सांगितले. त्यावेळेस ती मोठमोठ्याने ओरडू लागल्याने मी घराबाहेर गेलो. आमच्या घराबाहेर असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या समोर माझ्या मुलावर तीन अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार केले आणि पळ काढला. माझ्या मुलाच्या छाती, पोट, हात आणि डोक्यावर वार करण्यात आले होते. यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले".
(नक्की वाचा: Pimpri-Chinchwad: सांगवीमध्ये सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या)
सध्या नाशिक शहरात हत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहेत. किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलं हत्यारे उपसू लागली आहेत. काही दिवसांपूर्वीच पेठरोड परिसरामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पंचवटीतील पेठरोड परिसरात हत्येची घटना घडली आहे.
Nagpur Hit And Run Case | नागपूर हिट अॅड रन प्रकरणाला वेगळं वळण,आरोपींची कार परत करण्याची घाई का?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world