जाहिरात

Viral Girl: मजुराची मुलगी झाली 'करोडपती', आयकर विभागाने पाठवली 20 कोटींची नोटिस, कुटुंबातील सर्वच झाले थक्क

उन्नाव जिल्ह्यातील एका पदवीधर विद्यार्थीनीला शुक्रवारी 20.98 कोटी रुपयांच्या आर्थिक उत्पन्नाच्या आणि व्यवसायिक व्यवहारांच्या प्रकरणात आयकर विभागाने समन्स पाठवलं आहे.

Viral Girl: मजुराची मुलगी झाली 'करोडपती', आयकर विभागाने पाठवली 20 कोटींची नोटिस, कुटुंबातील सर्वच झाले थक्क
20 Crore Income Tax Notice UP News

Income Tax Notice Viral Story : उन्नाव जिल्ह्यातील एका पदवीधर विद्यार्थीनीला शुक्रवारी 20.98 कोटी रुपयांच्या आर्थिक उत्पन्नाच्या आणि व्यवसायिक व्यवहारांच्या प्रकरणात आयकर विभागाने समन्स पाठवलं आहे. विद्यार्थीनीने दावा केला आहे की,दिल्लीच्या एका बोगस कंपनीने तिचं आधार आणि पॅनकार्डचा दुरूपयोग केला आहे.गिरीजाबाग परिसरात राहणाऱ्या रश्मी सविताने म्हटलंय की,आयकर विभाग (चंदीगढ) तिच्या विरोधात आयकर अधिनियमच्या कलम 131 (1A) अंतर्गत समन्स जारी केलं होतं. ज्यामध्ये पाच मे पर्यंत उत्तर मागण्यात आलं होतं.

रश्मीने दिलेल्या माहितीनुसार,समन्समध्ये कथितपणे 20.98 कोटी रुपयांचं उत्पन्न आणि व्यावसायिक व्यवहाराप्रकरणी माहिती मागवण्यात आली होती.रश्मीने म्हटलं की,याप्रकरणी माहिती गोळा केल्यावर तिला समजलं की,आरएस एंटरप्रायझेस नावाची एक कंपनी तिच्या आधार आणि पॅन कार्डचा वापर करून दिल्लीच्या बुराडी परिसरात काम करत होती. रश्मी सविताने पुढे म्हटलं की,तिला त्या कंपनीबाबत काहीही माहित नव्हतं.कंपनीने 15 जानेवारी 2025 रोजी मोहिम सुरू केली आणि 9 मे 2025 रोजी बंद केली. तिने म्हटलं की, तिच्याकडे या कंपनी किंवा कंपनीशी जोडलेल्या कोणत्याही व्यवसायाची कोणतीही माहिती नाही. 

नक्की वाचा >> Amravati News: 'त्या' उड्डाणपुलाचं लोकार्पण रखडलं,अमरावतीकर वाहतूक कोंडीच्या विळख्यात, प्रवाशांचा जीव टांगणीला

मजुरीचं काम करतात रश्मीच वडील

रश्मीचे वडील अजय शंकर मजूर आहेत. कुटुंबाचं म्हणणं आहे की,तिने कधीही कोणती कंपनी स्थापनकेली नाही. तसच तिचा कोट्यवधि रुपयांचा कोणताही व्यवसाय नाही.कुटुंबाला संशय आहे की,कोणीतरी फसवणूक करून एक कंपनी स्थापन करून आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी तिच्या कागदपत्रांचा दुरुपयोग केला आहे. रश्मीने म्हटलंय की, तिने आयकर विभागाकडे तिचा जबाब नोंदवला आहे.याशिवाय तिने तिचा आधार आणि पॅन कार्डचं दुरुपयोग झाल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.तसच तिने सार्वजनिक कम्प्लेंट पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. तिने पोलिसांकडे मागणी केली आहे की, याप्रकरणी तपास करून जबाबदार लोकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. 

नक्की वाचा >> Akola News : अकोल्याच्या नव्या बस स्थानकात प्रवाशांमध्ये भीतीचं सावट, गर्दीच्या ठिकाणी महिलेसोबत संतापजनक घटना

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com