देवा राखुंडे, इंदापूर
मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर एकच्या पुलाजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून मृतदेह घेऊन नांदेडकडे ही रुग्णवाहिका निघाली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या या चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
(नक्की वाचा- RBI Report : 'लाडकी बहीण'सह अनेक योजना बंद होणार? RBI च्या सल्ल्यामुळे लाभार्थ्यांची चिंता वाढली)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णवाहिकेत चालकासह सात प्रवासी होते सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. सर्वजन पुणे येथील ससून हॉस्पिटलमधून निघाले होते. मात्र रुग्णवाहिकी इंदापूरच्या काळेवाडी नंबर एक येथील पूलाजवळ पोहोचताच स्टेअरिंग रॉड तुटला.
(नक्की वाचा- Success story: आधी नापास झाला मग यशाचा मानकरी ठरला! शेतकऱ्याच्या लेकानं काय केलं?)
स्टेअरिंग रॉड तुटल्यानंतर चालकांचं नियत्रण सुटलं. त्यानंतर रुग्णवाहिका रस्ता ओलांडून सोलापूर-पुणे लेनवर येऊन उलटली. त्यामुळे विरुद्ध दिशेहून येणाऱ्या वाहनांचं देखील यात मोठं नुकसान झालं.
पाहा VIDEO