प्रवीण मुधोळकर
हरप्रीत सिंह ललिला हा अमेरिकेतून डिपोर्ट केलेला भारतीय आहे. तो मुळचा नागपूरचा राहाणार आहे. त्यालाही परदेशात जावून पैसे कमवायचे होते. त्यामुळे तोही एका एजंटच्या माध्यमातून कॅनडाला जाण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने कॅनडातल्या एजंट बरोबरही संपर्क केला होता. शिवाय 18 लाख ही दिले होते. पण हरप्रीत सिंह ललिला याच्या बरोबर भलतचं घडलं. कॅनडासाठी निघालेला हरप्रीत प्रत्यक्षात अमेरिकेत पोहोतला, तो ही गन पॉईंटवर. या प्रवासात त्याच्या बरोबर काय काय झाले हे अंगावर काटा आणणारे क्षण त्यांने NDTV मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कॅनडात हरप्रीतला ड्रायव्हींगसाठी जायचं होतं. त्यासाठी त्यानेही एजंट मार्फत जाण्याचा निर्णय घेतला. त्याला एजंटने विश्वास दाखवला होता. त्यानुसार त्याचा व्हिसा झाल्याचेही त्याला सांगण्यात आले. त्यानुसार दिल्लीवरून तो अबूधाबीला गेला. मात्र तिथून त्याला कॅनडाला जावू दिले नाही. त्यामुळे तो परत भारतात आला. त्यानंतर त्याला पुन्हा कॅनडासाठी पाठवण्यात आले. यावेळी आधी तो इजिप्तला गेला. तिथून त्याला स्पेनला पाठवण्यात आले. तिथे त्याला टॉयलेटमध्ये रहावं लागल्याचं त्याने सांगितले.
स्पेन वरून नंतर ग्वाटामाला, नकारागुआ, होंडारूस अशा देशात घेवून जाण्यात आलं. त्यावेळी तिथे आमच्या सोबत तिथले माफिया होते. ते सांगतिल तसं आम्हाला करावं लागत होतं.माझ्या समोर माफीयांनी एकाला गोळ्या घातल्या. मला कॅनडा येथे जायचे होते. पण माफियांनी मला गन पाईंटवर मॅक्सिको येथे नेऊन अमरिकेत प्रवेश दिला. त्यावेळी माझ्या कुटुबियांकडून जवळपास पन्नास लाख रुपये माफियांनी उकळले. मी ट्रक ड्रायव्हर बनन्यासाठी कॅनेडात जाणार होतो. पण मी अमेरिकेत पोहचलो, असं हरप्रीत सिंहने सांगितलं.
माफिया आणि अमेरिकन सरकार मधील अधिकारी, पोलीस यांच्यात साटेलोटे आहे, असं ही त्याने या निमित्ताने सांगितले. या साटेलोटेमुळेच मेक्सिको सीमेवरुन आम्हाला माफिया अमेरिकेत सहज घेऊन गेले. अमेरिकेत माझ्या सारखे अनेक लोक अवैध पध्दतीने वास्तव्यात आहेत असंही त्याने सांगितले. ट्रम्प सरकार आल्यानंतर आम्हाला अमेरिकेत पकडले गेले. त्यानंतर आता आम्हाला भारतात आणून सोडण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world