
Bomb Threat to Indigo Plane : कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने विमानाचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. विमान सुखरूपपणे नागपूर विमानतळावर उतरवण्यात आलं असून, त्यात एकूण 157 प्रवासी आहेत. प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आलं आहे.
पोलीस विभाग आणि बॉम्ब शोधक पथकाने विमानाची तपासणी सुरू केली आहे. एटीसी (ATC) सोबत तातडीने संपर्क साधून हे लँडिंग करण्यात आलं. कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याचं धमकीच सांगणात आलं होतं. यापूर्वी अशा अनेक धमक्यांमध्ये काहीच आढळून आलं नव्हतं.
🔴BREAKING | कोच्ची से दिल्ली जा रही फ्लाइट की नागपुर एयरपोर्ट पर इमरजेंसी लैंडिंग pic.twitter.com/uSnNP0OF6D
— NDTV India (@ndtvindia) June 17, 2025
अशाचप्रकारे, सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांना मंगळवारी सकाळी कोलकाता विमानतळावर इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानातून उतरवण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फ्लाइट क्रमांक AI180 सोमवारी रात्री 1:45 वाजता विमानतळावर पोहोचली. परंतु डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पुढील उड्डाणाला विलंब झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world