Ashok Kharat: खरातच्या कार्यक्रमात गेले, हसत-हसत भाषणही ठोकलं; वरिष्ठ IPS अधिकारी गोत्यात? VIDEO समोर

Ashok Kharat Case Update: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता नवीन आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात राज्याच्या पोलीस दलातील उच्चपदस्थ आयपीएस (IPS) अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) दत्ता कराळे यांच्यावर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.

अंजली दमानियांची 'X' पोस्ट

अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, "श्री दत्ता कराळे हे एक IG लेवलचे पोलीस अधिकारी असताना खारतांसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खारतांवर विश्वास का नाही बसणार? त्यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे.  त्यांचे देखील थोडे थोडके नाही तर तब्बल 18 कॉल आहेत. ह्याचे उत्तर पोलिस महासंचालक श्री सदानंद दाते सरांनी घेतले पाहिजे." 

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO: स्वयंचलित दरवाजे, मोठ्या खिडक्या अन् बरंच काही; अ‍ॅडव्हान्स लोकल ट्रेन मुंबईत दाखल, पण...)

"एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे अशा भोंदू बाबाशी काय संबंध असू शकतात?" याची तातडीने चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे.

काय आहे अशोक खरात प्रकरण?

अशोक खरात याच्यावर भोंदुगिरी, जादूटोणा आणि लोकांच्या फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. याशिवाय अनेक महिलांवर त्याने फसवणूक करून किंवा धमकावून लैंगिक अत्याचार केल्याचेही आरोप आहेत. आतापर्यंत त्याच्याविरोधात डझनभरहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. अशा वादग्रस्त व्यक्तीसोबत एका आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याचे नाव जोडले गेल्याने नाशिक पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

(नक्की वाचा-  Photos: ऐतिहासिक ठेवा! 'राजगृह'च नव्हे तर बाबासाहेबांचा मावळमधील बंगलाही अनेक घडामोडींचा साक्षीदार

"पोलीसच जर अशा भोंदूगिरीला पाठबळ देत असतील, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?" असा सूर आता उमटत आहे. अंजली दमानिया यांच्या या आरोपांनंतर अद्याप आयजी दत्ता कराळे किंवा पोलीस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

Topics mentioned in this article