Mumbai News : मुंबईतील दादर येथील कबुतरखान्यावर बंदी घालण्याच्या निर्णयावरून सुरू असलेला वाद आता अधिकच पेटला आहे. याप्रकरणी जैन समाजाचे राष्ट्रीय मुनी निलेशचंद्र यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे. जैन समाज त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता व्यक्त निलेशचंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात मध्यस्थी करण्याचं आवाहन केलं आहे.
मुनी निलेशचंद्र यांनी म्हटलं की, "जैन समाज हा अहिंसावादी समाज आहे. आम्ही जगा आणि जगू द्या या भगवान महावीरांच्या मार्गावर चालतो. मुंगीपासून हत्तीपर्यंत कुणालाही इजा पोहोचवणे आमच्यासाठी पाप आहे. कबुतरांमुळे आरोग्याला धोका असल्याच्या आरोपांवर त्यांनी म्हटले की, कबुतरांमुळे कुणालाही नुकसान होत नाही. कबुतर एक शांतीप्रिय प्राणी आहे. 100-200 वर्षांपासून कबुतरखाने सुरू आहेत. तसेच, ज्यांच्याकडे चुकीची माहिती आहे, त्यांच्या आधारावरच उच्च न्यायालय आणि बीएमसीने चुकीचा निर्णय दिला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
(नक्की वाचा - संताप...संताप...संताप! कोर्टाचा अवमान करणाऱ्या जैनांना सोडून दिले, जाब विचारणाऱ्या मराठीजनांना पकडले)
...तर जैन समाज तुमच्या विरोधात जाईल
निलेशचंद्र पुढे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जैन समाज नाराज होत आहे, आक्रमक होत आहे. येणाऱ्या काळात जैन समाज तुमच्या विरोधात जाईल. हा राजकीय नसून धार्मिक विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जैन समाज तुमच्यासोबत जोडला गेला, कारण तुम्ही धार्मिक आहात. तुम्ही गोमातेला राजमाता घोषित केले.
(नक्की वाचा- Dadar Kabutar Khana: शस्त्र उचलण्याची भाषा कराल तर याद राखा! गोवर्धन देशमुखांचा जैन मुनींना थेट इशारा)
कबुतरांमुळेच श्वसनाचे आजार उद्भवतात असे नाही, असे सांगताना त्यांनी म्हटले की, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार असे 70 कारणे आहेत ज्यामुळे हे आजार होतात. या वक्तव्यावरून निलेशचंद्र यांनी कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.