जाहिरात

Dadar Kabutar Khana: शस्त्र उचलण्याची भाषा कराल तर याद राखा! गोवर्धन देशमुखांचा जैन मुनींना थेट इशारा

जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेनंतर मराठी एकीकरण समितीदेखील आक्रमक झाली आहे. 'मराठी एकीकरण समिती'ने आज सकाळी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dadar Kabutar Khana: शस्त्र उचलण्याची भाषा कराल तर याद राखा! गोवर्धन देशमुखांचा जैन मुनींना थेट इशारा

Mumbai News : मुंबईतील दादर येथील कबुतरखाना येथे कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दादर कबुतरखाना परिसरात पक्ष्यांना खायला घालण्यास बंदी घातली आहे. मात्र यावरून जैन समुदाय आक्रमक झाला आहे. "गरज पडल्यास आम्ही शस्त्र उचलू.", असा इशारा देखील जैन मुनींना दिला आहे.

जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेनंतर मराठी एकीकरण समितीदेखील आक्रमक झाली आहे. 'मराठी एकीकरण समिती'ने आज सकाळी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शस्त्र काढण्याची भाषा करणाऱ्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल, असा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे.

(नक्की वाचा-  Mumbai News : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे एकाचा व्यासपीठावर येणार; काय आहे निमित्त?)

समितीने यासंदर्भात पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही कबुतरांपासून मानवी जीवनाला धोका असल्याचे मान्य केले आहे, तरीही यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे समितीने म्हटले आहे.

एका विशिष्ट समाजाचा हेकेखोरपणा सुरूये

सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि आरोग्य विषयक काम करणाऱ्यांना आजच्या आंदोलनाला उपस्थित राहिलं पाहिजे. स्थानिक रहिवाशांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला कबुतर खाना इथे नकोय, मग तुम्ही प्रशासनावर दडपशाही का करत आहे. एका विशिष्ट समाजाचा हेकेखोरपणा सुरु आहे. तुम्ही चाकू सुरी आणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत आहेत. तुम्ही शांतीप्रिय समाज आहेत आणि तुमच्या समाजाचे मुनी कशा पद्धतीची भाषा करतात पाहा. म्हणून आम्हाला तिथे जावं लागत आहे, सर्व तिथे उपस्थित असतील, असं गोवर्धन देशमुख यांनी म्हटलं.

(नक्की वाचा-  Pune News: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना AI च्या मदतीने धडा शिकवणार; पुणे पोलिसांचा अभिनव प्रयोग)

कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर जबाबदार कोण?

पोलिसांच्या दडपशाहीची आम्हाला सवय आहे. मराठी राज्यात आम्ही राहतोय की इतर राज्यात राहतोय, असा अनुभव आम्हाला वेळोवेली येतो. आम्हाला प्रशासनाचा त्रास होतो. आजचा प्रश्न आरोग्याचा आहे. कुणीतरी शस्त्रांची भाषा करतंय, आंदोलनाची भाषा करतंय, नागरिकांना वेठिस धरलं जात आहे. उद्या राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आम्हाला पडतोय, यासाठी आजचं आंदोलन आहे. आम्ही तिथे जाऊन पोलीस, गृहविभाग आणि महापालिकेला प्रश्न विचारणार आहोत, असंही गोवर्धन देशमुख यांनी सांगितलं.

मंगलप्रभात लोढांवर निशाणा

कबुतरखाना येथे अवैधरित्या आंदोलन करणाऱ्यांविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. सत्ताधारी एक मंत्री यांच्या बाजून आहे. सत्तेचा वापर सध्या केला जात आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांना आम्ही आवाहन करतो की आपण १४ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे मंत्री आहे, एका विशिष्ट समाजाचे मंत्री नाही आहात. दरवेळी आपण एका विशिष्ट समाजाच्या बाजूने उभे राहाता. सत्तेत असून सत्तेच्या विरोधात आंदोलन करता. मग इतर समाज आणि नागरिकांबद्दल त्यांच्या मनात आकस आहे का? असा प्रश्न गोवर्धन देशमुख यांनी केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com