अमजद खान, कल्याण
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. शेगाव येथून पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता. पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घटनेनंतर आरोपीविरोधात नागरिक संतप्त झाले आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. नागरिकांनी आज तोंडाला काळ्या फिती लावून निषेध मोर्चा काढला. नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या. बदलापूरमधील आरोपीप्रमाणे विशाल गवळी याचा एन्काऊंटर करा, असा संताप शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी व्यक्त केला.
(नक्की वाचा - खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?)
संपूर्ण घटनाक्रम
- 23 तारखेला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते.
- आईकडून 20 रुपये घेऊन अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती.
- अल्पवयीन मुलगी परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला.
- मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली.
- 24 डिसेंबर रोजी मुलीच्या मृतदेह कल्याणनजीक बापगाव परिसरात सापडला.
- मुलीच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे हॉस्पिटलला पाठवण्यात आला.
- शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले की मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.
- पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीचेही नाव समोर आले आहे.
- विशाल गवळी याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
- घटनेच्या विरोधात नागरिकांनी आज निषेध मोर्चा काढला.
- आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली.
- विशाल गवळी याला त्याच्या पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.