KDMC News: कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ! जलशुद्धीकरण केंद्रातील संतापजनक VIDEO समोर

KDMC News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात एक भटका कुत्रा मृतावस्थेत पडल्याचा दावा केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan- Dombivli News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. केडीएमसीच्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पाणी शुद्धीकरण प्रक्रियेच्या मुख्य आवारातच एक भटका कुत्रा मृतावस्थेत पडला असल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यामुळे केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाच्या स्वच्छतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या आरोग्याला धोका; परिसरात दुर्गंधी

मोहिली येथील या जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज लाखो लिटर पाणी शुद्ध करून ते कल्याण आणि डोंबिवली शहरातील अनेक प्रमुख भागांमधील घराघरांमध्ये पुरवले जाते. हजारो नागरिकांची तहान भागवणाऱ्या या शासकीय केंद्रात मृत प्राणी आढळल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Kolhapur News: बाळाच्या बारशाची लगबग; नवरा, सासू-सासरे हॉल पाहायले गेले; आईने संपवलं आयुष्य)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, मृत कुत्रा पाणी शुद्धीकरण यंत्रणेच्या अगदी जवळ पडलेला असून, वेळेत त्याची विल्हेवाट न लावल्यामुळे संपूर्ण परिसरात अत्यंत तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर आणि शुद्धतेवर विपरीत परिणाम होऊन नागरिकांना साथीच्या आजारांची लागण होण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

(नक्की वाचा-  IMD Rain Alert: महाराष्ट्र पाऊस कधी परतणार? मान्सूनबाबत मोठी अपडेट; 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज)

महापालिका प्रशासनाचं मौन

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला असला, तरी या व्हिडिओच्या सत्यतेची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. दुसरीकडे, हा संवेदनशील व्हिडिओ समोर येऊनही कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन किंवा संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 
 


Topics mentioned in this article