कल्याण-डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराची कीड, अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा VIDEO आला समोर 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दक्षता गुणनियंत्रण विभागाचा अधिकारी संजय सोमवंशी हा कंत्राटदाराकडून पैसे घेताना दिसून येत आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

कल्याण डोंबिवली महापालिकेत भ्रष्टाचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. आतापर्यंत 40 अधिकारी, कर्मचारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. आता पु्न्हा एकदा एका अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दक्षता गुणनियंत्रण विभागाचा अधिकारी संजय सोमवंशी हा कंत्राटदाराकडून पैसे घेताना दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्याला केडीएमसी आयुक्तांनी निलंबित केलं आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकारी पैसे घेताना अनेकदा एबीसीच्या जाळ्यात सापडले आहेत. सुनील जोशी नावाच्या अधिकाऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली होती. काही वर्षापूर्वी केडीएससीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनाच लाच स्वीकारताना एबीसीने रंगेहात पकडले होते. या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे महापालिका बदनाम झाली आहे. त्यात आता आणखी एक व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली. 

(नक्की वाचा-  कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे शिवसेना आमदाराचा संताप, केडीएमसी आयुक्तांना इशारा)

दक्षता गुण नियंत्रण विभागाचे अधिकारी संजय सोमवंशी हे एका कंत्राटदाराकडून पैसे घेताना व्हिडिओत दिसत आहे. महापालिकेचा दक्षता गुण नियंत्रण विभागद्वारे महापालिकेकडून सुरु असलेल्या स्थापत्य स्वरुपाची कामे करताना गुणवत्ता राखली जात आहे की नाही याची तपासणी केली जाते. त्याठिकाणी असलेल्या सिमेंट, डांबर, रेती आदी साहित्य योग्य प्रतिचे आहे की नाही याची प्रयोगशाळेत तपासणी करुनच पुढील कामासाठी अनुमती दिली जाते. 

(नक्की वाचा - Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग; अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर खलबतं)

या विभागाचा अधिकारीच अशा प्रकारे पैसे घेत असल्याचे व्हिडीओत उघड झाल्याने दक्षता गुणनियंत्रण विभागाकडून गुण नियंत्रण पैसे घेऊन केले जात आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर केडीएमसी आयुक्त या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

केडीएमसी आयुक्तांची कारवाई

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी कडक कारवाईचा इशारा दिला होता. व्हिडिओ पाहून शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असं आयुक्त इंदूराणी जाखड यांनी म्हटलं होतं. त्यानुसार केडीएमसीचे अधिकारी संजय सोमवंशी यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Topics mentioned in this article