जाहिरात

Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग; अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर खलबतं

Amit shah : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे.

Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग; अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर खलबतं
मुंबई:

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री 8 सप्टेंबरला रविवारी मुंबईत दाखल झाले. यावेळी शाह यांचा ताफा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाला. यावेळी अमित शाह यांची महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाल्याची माहिती आहे. या बैठकीत राज्यातील निवडणुकींवर चर्चा झाली. यावेळी अमित शाह यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना मूलमंत्र दिला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात  फोकस करावं असंही शाह यांनी सांगितलं.  स्थानिक विकास मुद्दे, राज्यातील शासनाच्या योजना यावर प्रचार प्रसार फोकस असावा असे अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा - …तर महाराष्ट्रात तुम्हाला पाय ठेवू देणार नाही, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

बैठकीत खालील मुद्दयांवर प्रामुख्याने चर्चा…
- विरोधक शासन प्रतिमा फेक नरेटिव्ह करत राहतील त्यास प्रतिउत्तर द्यावेच लागेल. 

- महायुती एैक्य ठेवत विधानसभा जागा वाटप लवकर सोडवावी. 

- पुढील काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात देशातील भाजपच्या इतर नेत्यांकडे जबाबदारी दिली जाईल. नियुक्ती केलेल्या नेत्यांची राज्यातील प्रचारासाठी लवकर सक्रिय होतील.  

- आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात भाजप पक्षाचे प्रचार कॅम्पेन जोरदार सुरू होणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com