Kalyan News : ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वितुष्ट सर्वज्ञात आहे. मात्र कल्याण डोंबिवलीत या दोन्ही कट्टर विरोधकांच्या नगरसेवकांचं मनोमिलन आज पाहायला मिळालं . कल्याण पूर्वेकडील द्वारली येथे ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांच्या कार्यालयाचं उद्घाटन चक्क शिंदे शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या उद्घाटनाच्या वृत्तानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिंदे शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांना त्यांच्या उपस्थितीबद्दल विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, मला आमंत्रण दिलं होतं म्हणून मी आलो. खंबायत आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत असंही ते पुढे म्हणाले. तर ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबाळे यांनी सांगितलं, यामध्ये कोणतेही पक्ष भेद नाहीत. आमचे गटनेते पुण्याला आहेत. दुसरीकडे कुणाल पाटील यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. मोठा भाऊ या नात्याने मी त्यांना उद्घाटनाला बोलावलं. दुसरा कोणताही अर्थ काढू नये असंही ते यावेळी म्हणाले.
मैत्रीच्या संबंधात ठाकरे गटाच्या नगरसेवकाच्या कार्यालयाचं उद्घाटन...
कल्याण पूर्वेतील द्वारली परिसरात केडीएमसीचे शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांचे हस्ते करण्यात आले. आमचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं दोघांकडून सांगितलं जात आहे. परंतु ठाकरे गटाचे निलेश खंबायत हे लवकरच शिवसेना गटात प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत निलेश खंबायत यांनी सांगितलं की, आमच्या गटाचे नेते उमेश बोरगावकर हे पुण्यात आहे.
इतर नेते संध्याकाळी दुसऱ्या नगरसेवकाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत. त्यामुळे मी आज दुपारी या कार्याचे उद्घाटन केले आहे. माझ्या आणि कुणाल पाटील यांचे संबंध मैत्रीची आहे बाकी यामध्ये काही राजकारण नाही. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, नागरिकांसाठी आणि प्रभागात विकास करण्यासाठी ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांना जी काही निधी स्वरूपात मदत लागेल मी आणि माझे नेते डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीने केलं जाणार आहे. यात कोणताही प्रकारच्या राजकारण नाही
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर ठाकरे गटाचे चार नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात होते. यावरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार वादविवाद झाला. यातील तीन नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेले मधुर म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. सध्याच्या परिस्थितीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे 10 नगरसेवक आहेत. परंतु या नगरसेवकांची संख्या आणखी कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world