जाहिरात

Kalyan News: मलम लावले अन् आजार आणखीच वाढला; KDMC च्या हॉस्पिटलवर रुग्णाचा गंभीर आरोप, प्रकरण काय?

Kalyan News: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे (केडीएमसी) रुक्मिणीबाई रुग्णालय पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Kalyan News: मलम लावले अन् आजार आणखीच वाढला; KDMC च्या हॉस्पिटलवर रुग्णाचा गंभीर आरोप, प्रकरण काय?
Kalyan News: हे मलम वापरल्यानंतर रुग्णाचा आजार रुग्णाचा आजार अधिक वाढल्याचा आरोप आहे.
कल्याण:

Kalyan News: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे (केडीएमसी) रुक्मिणीबाई रुग्णालय पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला एक्सपायरी डेट संपण्याच्या अगदी जवळ आलेले मलम दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. हे मलम वापरल्यानंतर रुग्णाचा आजार कमी होण्याऐवजी उलट अधिकच वाढल्याचा दावा केला गेल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे महापालिका रुग्णालयाच्या औषध वितरण व्यवस्थेवर आणि त्यांच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

काय आहे प्रकरण?

कल्याण परिसरात राहणाऱ्या हिमांशू गुप्ता या तरुणाला खरुजचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी 23 जून रोजी रुक्मिणीबाई रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना लावण्याासाठी एक मलम दिले. मात्र, त्या मलमाच्या ट्यूबवर जून 2026 हीच एक्सपायरी डेट लिहिलेली होती, असे हिमांशू यांचे म्हणणे आहे. 

हे मलम त्वचेला लावल्यानंतर आराम मिळण्याऐवजी त्यांचा त्रास आणखीनच वाढला. औषधाची मुदत संपत आलेली असतानाही रुग्णांच्या जिवाशी असा खेळ का केला जात आहे, असा संतप्त सवाल आता रुग्णाकडून केला जात आहे.

( नक्की वाचा : कोट्यवधींच्या बजेटच्या बाता मारणाऱ्या KDMC चा असा कारभार; 'त्या' कुटुंबारील प्रसंग पाहून अंगावर येईल काटा )

मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांचे नियमावर बोट

या संपूर्ण प्रकरणावर केडीएमसीच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी रुग्णालयाची बाजू मांडली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मलमाची मुदत जून 2026 पर्यंत म्हणजेच चालू महिन्या अखेरपर्यंत होती. रुग्णाला हे औषध 23 जून रोजी म्हणजेच त्याची मुदत संपण्याच्या 7 दिवस आधी देण्यात आले होते. वैद्यकीय नियमांनुसार एक्सपायरी डेट संपण्यापूर्वी औषध देणे चुकीचे नाही, त्यामुळे औषध वितरणात नियमांचे उल्लंघन झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

( नक्की वाचा : Congress MLA: आणखी एक बाबा सिद्दीकी? बिश्नोई गँगच्या धमकीची काँग्रेस आमदारानं विधानसभेत दिली A to Z माहिती )

नेमकी चूक कोणाची?

औषध देणे नियमात बसत असले तरी रुग्णाची तक्रार गंभीर असल्याने प्रशासनाने याची दखल घेतली आहे. संबंधित मलम लावल्यामुळेच हिमांशू गुप्ता यांच्या त्रासात भर पडली की यामागे आणखी काही वैद्यकीय कारण होते, याचा शोध घेतला जात आहे. यासाठी प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतरच रुक्मिणीबाई रुग्णालयातील या औषध वितरणाचे नेमके सत्य समोर येणार आहे.


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com