जाहिरात

Kalyan News: विठ्ठलवाडी उड्डाणपूल वादात आता SIT ची एन्ट्री? खासदारांच्या पवित्र्यामुळे प्रशासनात धाकधूक

Kalyan News: कल्याण पूर्वेतील अशोकनगर-वालधुनी येथील बौद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाला आता एक नवे वळण मिळाले आहे.

Kalyan News: विठ्ठलवाडी उड्डाणपूल वादात आता SIT ची एन्ट्री? खासदारांच्या पवित्र्यामुळे प्रशासनात धाकधूक
Kalyan News: या वादात पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
कल्याण:

Kalyan News: कल्याण पूर्वेतील अशोकनगर-वालधुनी येथील बौद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाला आता एक नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या वादात पारदर्शकता आणण्यासाठी आणि स्थानिकांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

खासदारांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

बुधवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) मुख्य दालनात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीला केडीएमसीचे वरिष्ठ अधिकारी आणि भंतेजी गौतमरत्न महाथेरो उपस्थित होते. प्रेम ऑटो सर्कल ते विठ्ठलवाडी या उड्डाणपूल प्रकल्पामुळे बौद्धभूमी फाउंडेशनच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर खासदारांनी केडीएमसी आणि एमएमआरडीए (MMRDA) प्रशासनाला ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.

एसआयटी (SIT) चौकशी आणि जमीन व्यवहारांची पडताळणी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष चौकशी समिती म्हणजेच एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. या समितीमार्फत खालील बाबींची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार  संबंधित वादग्रस्त जमिनीच्या 7/12 उताऱ्यांची कायदेशीर तपासणी करावी.  या जमिनीशी संबंधित हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) व्यवहारांमध्ये काही अनियमितता झाली आहे का, याची समितीमार्फत चौकशी करावी. 30 मे रोजी झालेल्या कारवाईत काही गैरकृत्य झाले असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली आहे. 

( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये पुलाच्या कामासाठी खरंच बुद्धमूर्ती हटवल्या का? वाचा प्रशासनाने काय केला खुलासा )
 

उड्डाणपुलाचे अलाइनमेंट आणि नवीन विकास आराखडा

प्रकल्पाचा फटका बसू नये यासाठी उड्डाणपुलाच्या अलाइनमेंटचे पुनर्निरीक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, बौद्धभूमी फाउंडेशनच्या मागणीनुसार या ठिकाणी संरक्षण भिंत आणि पोहोच रस्ता बांधता येईल का, याची शक्यता तपासण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.   संबंधित जागेवर विपश्यना केंद्र, शैक्षणिक केंद्र, शाळा किंवा रुग्णालय यांसारख्या प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणे.या जमिनीवरील आरक्षण बदलण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करणे.जमीन संपादन आणि नुकसानभरपाईच्या प्रक्रियेतील पारदर्शकता तपासण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. 

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमधील 'तो' वाद आता थेट दिल्लीत! राहुल गांधी घेणार KDMC च्या कारवाईची दखल )
 

या निर्णयामुळे बौद्धभूमी फाउंडेशनच्या मागण्यांना बळ मिळाले असून, प्रशासनाकडून आता कशा प्रकारे कार्यवाही केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com