Kalyan News : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसलाय. गेल्या 2 दिवसांत भाजपच्या 2 मोठ्या आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा बदल स्थानिक भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यासाठी खूप मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांनी सोडली साथ
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर म्हात्रे आणि मंडल उपाध्यक्ष विमल कटके यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे त्यांनी एकट्यानेच नाही, तर आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह पक्षपदांचे राजीनामे दिले आहेत.एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे कल्याण पूर्व भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीत मोठी कारवाई! ZP ची बनावट परवानगी मिळवून बांधली इमारत; शिंदे सेनेच्या 2 नेत्यांना अटक )
काय आहे कारण?
राजीनामा दिलेल्या दोन्ही मोठ्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातील स्थानिक नेतृत्वावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पक्षासाठी अनेक वर्षांपासून एकनिष्ठेने काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना सातत्याने डावलले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाची स्थापना आणि वाढीसाठी घाम गाळणाऱ्या निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करून, नुकत्याच पक्षात दाखल झालेल्या नवीन व्यक्तींना मोठी पदे आणि महत्त्वाची संधी दिली जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. याच कारणामुळे अखेर सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
( नक्की वाचा : Latur News: लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मेहुल राठोड यांनी संपवलं स्वत:चं आयुष्य )
या दोन बड्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यानंतर कल्याण पूर्व येथील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या राजकीय भूकंपावर आता भाजपचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक आमदार सुलभा गायकवाड नेमकी काय भूमिका घेणार, नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world