अमजद खान
दारुच्या नशेत स्टेशन परिसरात आले. खिशातून सिगारेट काढली. टपरी चालकाकडून माचिस मागितली. मात्र टपरी चालकाने माचिस देण्यास नकार दिला. या कारणावरुन संतप्त झालेल्या दोन तरुणांनी कोयता काढला. शिवागाळ सुरु केली. हातात कोयता पाहून प्रवाशांमध्ये दहशत पसरली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी दहशत माजविणाऱ्या दोघांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मिडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?
या व्हिडिओ मध्ये दोन तरुण दिसत आहेत. दोघांपैकी एक लोकांच्या दिशेने शिवीगाळ करीत आहे. तर दुसरा हातात कोयता घेऊन उभा आहे. आमच्या नादाला लागू नका. एका एकाला खल्लास करुन टाकणार. हा सगळा प्रकार एका जागरुक नागरीकाने मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. व्हिडिओ समोर येताच कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाळकृष्ण परदेशी यानी तपास कामाकरीता पथके तयार केली.
त्यानंतर पोलिसांनी दोघांना शोधून काढले. मध्यरात्री हाती कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. निलेश शेलार आणि मेघनाथ भंडारी अशी या दोघांची नावे आहे. दोघेही कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील राहणारे आहेत. याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे का याचा तपास पोलिस करीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे दारुच्या नशेत कल्याण पूर्वेतून कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात आले. त्यांनी सिगारेट पिण्याकरीता टपरी चालकाकडे माचिस मागितली. त्याने माचिस देण्यास नकार दिल्याने या दोघांनी हाती कोयता घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.