Kalyan News: कल्याण हादरले! कर्ज मंजूर झाल्याचे सांगून महिलेला घरात बोलावले, दरवाजा बंद केला आणि पुढे...

Kalyan News : या संतापजनक घटनेप्रकरणी कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News : पीडित महिला घरात येताच त्यांनी दरवाजा आतून बंद केला
कल्याण:

Kalyan News : कल्याणमध्ये एका महिलेवर "भाऊजींसोबत संबंध आहेत" असा खोटा संशय घेत तिला घरात डांबून ठेवल्याचा आणि दोन तास बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्ज देणारे साहेब आले आहेत असे खोटे सांगून या महिलेला बोलावून घेण्यात आले आणि नंतर हा अमानुष छळ करण्यात आला. या संतापजनक घटनेप्रकरणी कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. एका महिलेसोबत झालेल्या या गैरवर्तनामुळे कल्याण परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण परिसरात राहणाऱ्या एका पीडित महिलेने या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेला एका अनोळखी महिलेचा फोन आला होता. लोन देणारे साहेब आले आहेत, तुम्ही तातडीने भेटायला या, असे या फोनवर सांगण्यात आले होते. या विश्वासापोटी पीडित महिला संबंधित पत्त्यावर पोहोचली. मात्र, ती घरात जाताच तिथे सुजित जाधव आणि संकेश शिंदे हे दोघे आधीच दबा धरून बसले होते. महिला घरात येताच त्यांनी दरवाजा आतून बंद केला आणि तिला तिथेच डांबून ठेवले.

Advertisement

( नक्की वाचा : Kalyan News: मलम लावले अन् आजार आणखीच वाढला; KDMC च्या हॉस्पिटलवर रुग्णाचा गंभीर आरोप, प्रकरण काय? )

दोन तास बेदम मारहाण आणि गैरवर्तन

घरातील कडी लावल्यानंतर या दोघांनी पीडित महिलेवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तुझे आमच्या भाऊजींसोबत संबंध आहेत, तुझी एवढी हिंमत कशी झाली, असा आरोप करत त्यांनी महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने आपला अशा कोणत्याही व्यक्तीशी संबंध नसल्याचे वारंवार सांगितले, तरीही आरोपींनी तिचे काहीही ऐकले नाही. त्यांनी तिला तब्बल दोन तास घरात कोंडून बेदम मारहाण केली आणि तिचा विनयभंग करत गंभीर गैरवर्तन केले. या छळातून सुटका झाल्यानंतर पीडित महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले.

( नक्की वाचा : कोट्यवधींच्या बजेटच्या बाता मारणाऱ्या KDMC चा असा कारभार; 'त्या' कुटुंबारील प्रसंग पाहून अंगावर येईल काटा )
 

पोलिसांत गुन्हा दाखल; आरोपींचा शोध सुरू

आपला कोणत्याही व्यक्तीशी संबंध नसताना केवळ खोट्या संशयावरून आपल्याला डांबून मारहाण करण्यात आली, असा दावा महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. कल्याण विभागाचे एसीपी अशोक होनमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. तपासादरम्यान समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे आरोपींवर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
 

Topics mentioned in this article