शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. त्यानंतर ही धमकी आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात मिळाली आहे. फेसबुक अकाऊंटवरुन दीपक कदम नावाच्या वक्तीने ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. त्यानंतर ही धमकी आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

(नक्की वाचा - ढाब्यावाल्याने पार्सलचे पैसे मागितले, त्याने चॉपर काढला; अन् मग... )

द्वारली येथील जमिनीच्या वादातून भाजप आमदार गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणी आमदार गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील त्यांचा मुलगा हा फरार आहे. तसेच इतरही काही आरोपी या प्रकरणात फरार आहेत. महेश गायकवाड यांना गोळ्या लागल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर महेश गायकवाड यांनी त्यांचे राजकीय कामकाज सुरु केले. 

(नक्की वाचा: केक भरवण्यावरून वाद, मित्रच मित्राला भिडला; भयंकर शेवट)

कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीच्या प्रचारात महेश गायकवाड हे सक्रीय होते. दीपक कदम नावाच्या व्यक्तीने फेसबुक अकाऊंटवरुन महेश गायकवाड यांना धमकी दिली आहे. भाजप आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या होत्या. मी आठ गोळ्या घालीन. कदम याने महेश गायकवाड यांना जीवे  ठार मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी येताच महेश गायकवाड यांनी कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन फेसबुक अकाऊंटद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कदम याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

(नक्की वाचा - निवडणूक लढवली, लाखभर मते मिळवली; मविआचं टेन्शन वाढवणारे बाबू भगरे अचानक कुठे गायब झाले?)

सोशल मीडियाद्वारे महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. धमकी देणारा कदम हा कोण व्यक्ती आहे? त्याने अशा प्रकारे महेश गायकवाड यांना का धमकी दिली? या प्रकरणाचा उलगडा तपासअंती होणार आहे. महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणानंतर पुन्हा त्यांना गोळ्या घालण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article