प्रांजल कुलकर्णी, नाशिक
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे निवडून आले आहेत. भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक आहे. मात्र भास्कर भगरे यांना पराभूत करण्यासाठी उत्तर नियोजन केल्याचं समोर आलं आहे. मात्र तरीही भास्कर भगरे यांनी येथून बाजी मारली आहे.
कारण दिंडोरी येथून बाबू भगरे नावाचा अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात होता. नावात साधर्म्य असल्याने बाबू सदू भगरे यांनी देखील 1 लाख 3 हजार मते मिळवली. दरम्यान माझा पराभव व्हावा या उद्देशानेच भारती पवार यांनी माझ्या आडनावाशी समान असलेल्या उमेदवाराला उभे केले होते, अशी टीका विजयी उमेदवार भास्कर भगरे यांनी केली.
(नक्की वाचा - साताऱ्यात पवारांचा मावळा का हरला? मोठं कारण आलं समोर)
मात्र आता यात घडामोडींदरम्यान नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण बाबू भगरे आता नॉट रिचेबल झाले आहे. भगरे यांच्या मुलाने ते संध्याकाळपर्यंत घरी न आल्याची पोलिसांना तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे.
कोण आहेत बाबू भगरे?
बाबू भगरे हे तिसरी पास आहे. नाशिकमधील गंगावाडी गावातील ते रहिवासी असून 10 बाय 10 च्या साध्या घरात ते राहतात. बाबू भगरे हे मोलमजुरी आणि मासेमारी करतात. तरीही उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावापुढे सर म्हणून उल्लेख होता.
(नक्की वाचा - मुंबईचा बडा नेता थेट उत्तर प्रदेशातून निवडणूक रिंगणात, निकाल काय लागला?)
महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार भास्कर भगरे हे शिक्षक असूनही त्यांच्या नावासमोर सर उल्लेख नव्हता. बाबू भगरे यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. मात्र लाखभर मते मिळाल्याने बाबू भगरे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत.
बाबू भगरे हे सध्या गायब झाले असल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. संध्याकाळपर्यंत ते घरी न आल्यास नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे त्यांचा मुलगा रणजित भगरे यांनी म्हंटलं आहे.
(नक्की वाचा - महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world