जाहिरात

Kalyan News: कल्याणमधील झाडांवर विषप्रयोगाचा संशय, छिद्र करून विषारी रसायन भरलं?

Kalyan News: कल्याण पश्चिमेतील गणपती चौक ते डीबी चौक दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या 7 ते 8 'टेबेबुइया' झाडांवर अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Kalyan News: कल्याणमधील झाडांवर विषप्रयोगाचा संशय, छिद्र करून विषारी रसायन भरलं?

कल्याण शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या झाडांना जाणीवपूर्वक मारण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील मुख्य रस्त्यावरील मौल्यवान 'टेबेबुइया' (Tabebuia) म्हणजेच गुलाबी व पिवळी फुले येणाऱ्या झाडांवर अज्ञात समाजकंटकांनी विषप्रयोग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

झाडांच्या खोडांना केले ड्रिल

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील गणपती चौक ते डीबी चौक दरम्यान रस्त्या शेजारी असलेल्या सुमारे 7 ते 8 टेबेबुइया झाडांना लक्ष्य करण्यात आले. अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी किंवा गर्दीचा फायदा घेऊन ड्रिल मशीनच्या साहाय्याने या झाडांच्या मुख्य खोडांमध्ये मोठी छिद्रे केली. या छिद्रांमधून झाड सुकवण्यासाठी किंवा मारण्यासाठी काही घातक रासायनिक द्रव्य (इंजेक्शनसदृश्य) आत टाकल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

(नक्की वाचा-  Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)

केडीएमसीकडून तातडीने पंचनामा

झाडांना जाणीवपूर्वक नुकसान पोहोचवण्याचा हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या आणि पर्यावरणप्रेमींच्या लक्षात येताच त्यांनी पालिका प्रशासनाला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकारी स्नेहल धांडे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी सर्व बाधित झाडांची प्रत्यक्ष पाहणी करून या घटनेचा रीतसर 'पंचनामा' केला आहे.

(नक्की वाचा-  Nashik News: विवाहितेचा 8 वेळा गर्भपात; कारण ऐकून सारेच हादरले; नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना!)

अज्ञातांवर होणार कायदेशीर कारवाई

शहराचे सुशोभीकरण करणाऱ्या झाडांवर अशा प्रकारे अमानुष हल्ला झाल्याने कल्याणमधील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. या प्रकारामागे नेमके कोण आहे आणि झाडे मारण्यामागे त्यांचा काय हेतू होता, याचा शोध महापालिका आणि स्थानिक पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com