
- मुंबई के पास करजत में मुस्लिम समुदाय के लिए हलाल लाइफस्टाइल टाउनशिप को लेकर विवाद उत्पन्न हुआ है
- नेशनल ह्यूमन राइट्स कमीशन ने महाराष्ट्र सरकार को इस टाउनशिप के नाम और स्वरूप पर नोटिस जारी किया है
- शिकायत में कहा गया है कि धर्म आधारित कॉलोनी संविधान के बराबरी और भेदभाव न करने के सिद्धांत का उल्लंघन करती है
Karjat Halal Township only for muslims : मुंबईपासून साधारण 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्जतमध्ये बांधलेल्या टाउनशिपवरुन वादंग सुरू झाला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्र सरकारला याबाबत नोटीसही बजावली आहे. या संपूर्ण वादाचे कारण या टाउनशिपचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. हे टाउनशिप केवळ मुस्लीम समुदायासाठी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप नावाने प्रमोट केलं जात आहे. त्यामुळेच याबाबत वाद निर्माण झाला आहे.

NHRC कडे आलेल्या तक्रारीनुसार, अशा प्रकारे धर्माच्या आधारावर निवासी वसाहती स्थापन करणं थेट सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देत आहे. अशा प्रकारच्या वसाहतीमुळे समानता आणि भेदभाव न करण्याच्या तत्वाचं उल्लंघन होत आहे. तक्रारदाराने केलेल्या दाव्यानुसार, या प्रोजेक्टला RERA (मुंबई) ने मंजुरी दिली आहे. ज्यामुळे सुरक्षा आणि सामाजिक स्तरावर धोका वाढू शकतो.
NHRC ची तक्रारीची गंभीर दखल घेत NHRC ने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांकडून दोन आठवड्यांच्या आत कारवाई अहवाल (ATR) मागितला आहे. RERA ने या प्रकल्पाला कोणत्या तरतुदीनुसार मान्यता दिली हे सरकारने स्पष्ट करावे असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. धर्माच्या आधारावर अशा कोणत्याही वसाहतीला परवाना देणे हे देशाच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेच्या विरोधात आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world