Ketan Agrawal Murder ...चेतननं शिकवले कड्यावरून कसे ढकलायचे; सियासोबत केला 'इथं' सराव, धक्कादायक माहिती उघड

Ketan Agrawal Murder Case: लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून होणाऱ्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच केतन अग्रवालला दरीत ढकलून देण्यापूर्वी सियाने याचा मोठा सराव केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ketan Agrawal Murder : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवी माहिती उघड झाली आहे.
पुणे:

Ketan Agrawal Murder Case: लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून होणाऱ्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजेच केतन अग्रवालला दरीत ढकलून देण्यापूर्वी सियाने याचा मोठा सराव केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सियाने हा कट अचानक रचला नव्हता, तर तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून या संपूर्ण कृत्याची आधी प्रॅक्टिस केली होती. पुणे पोलिसांनी या संतापजनक आणि तितक्याच चक्रावून टाकणाऱ्या कटाचा खुलासा केला असून या संपूर्ण प्रकरणात आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या खुनाच्या प्रॅक्टिसची खातरजमा करण्यासाठी आणि घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस आता आरोपी सियाला घेऊन थेट त्या डोंगरावर पोहोचले आहेत.

बॉयफ्रेंडसोबत केली होती प्रॅक्टिस

केतन अग्रवालला लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून धक्का देऊन मारण्यात सियाला सहज यश आले नव्हते. यासाठी तिने आपला बॉयफ्रेंड चेतन याच्यासोबत मिळून एक अतिशय भयंकर कट रचला होता. पुणे येथील लुल्ला नगर सेक्टर नंबर 37 मधील एका डोंगरावर या दोघांनी मिळून केतनला कड्यावरून कसे ढकलायचे, याची रीतसर प्रॅक्टिस केली होती. 

Advertisement

हा डोंगर सियाच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. आपल्या होणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने अशी प्रॅक्टिस केल्याचे समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.

( नक्की वाचा : Lohagad Fort: लोहगडावरील 'सिया पॉईंट'पाहण्यासाठी देशभरातून गर्दी; 2000 वर्षांच्या इतिहासाला अनपेक्षित वळण )

या तपासाचा एक भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलीस गुरुवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास सियाला घेऊन पुण्याच्या मार्केट यार्ड भागातील 'लीला कुंज' या तिच्या निवासस्थानी पोहोचले होते. या घरात सियाचे वडील प्रवीण गोयल, तिची आई आणि भाऊ साहिल गोयल राहतात. 

या घरात पोलिसांनी सुमारे 2 तास सियाच्या जुन्या जबाबांची उलटतपासणी केली आणि काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. घरची चौकशी पूर्ण केल्यानंतर पोलीस तिला थेट लुल्ला नगर येथील डोंगरावर घेऊन गेले आहेत, जिथे तिने धक्का देण्याचा सराव केला होता.

( नक्की वाचा : 'सिया पॉईंट' केवळ सुरुवात, जगभरातील भयानक जागा ठरत आहेत नवे पर्यटन स्थळ; पाहा Dark Tourism चा थरारक पॅटर्न )

 महत्त्वाचे पुरावे मिळणार?

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सरावाच्या ठिकाणाहून आणि सियाच्या घरातून या प्रकरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे आणि ठोस पुरावे हाती लागण्याची मोठी शक्यता आहे. कड्यावरून ढकलून देण्याचा सराव नेमका कसा केला गेला आणि यामध्ये चेतनने तिला कशी मदत केली, याचे तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावे पोलीस गोळा करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिली असून पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article