यशपाल सोनकांबळे, पुणे
लोहगड केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास जसाजसा पुढे सरकत आहे तसे नवनवे खुलासे समोर येत आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासादरम्यान या संपूर्ण हत्याकांडात आणखी एका तरुणाचे नाव समोर आले आहे. या नव्या संशयित तरुणाच्या प्रवेशामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.
आरोपी चेतन चौधरी आणि सियासोबत रचला होता कट
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तपासात नाव समोर आलेला हा नवा तरुण मुख्य आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. केतन अग्रवाल याच्या खुनाचा कट या तरुणाला आधीपासूनच माहिती होता, असा दावा पोलिसांच्या प्राथमिक तपासात करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यात किती वाढ? आकडेवारी आली समोर)
मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि त्याची साथीदार सिया यांनी केतनच्या खुनाचे संपूर्ण नियोजन या वर्गमित्र असलेल्या तरुणासोबत आधीच चर्चीले होते, अशीही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
तरुणाच्या भूमिकेचा पोलिसांकडून कसून तपास सुरू
खुनाचा कट आणि नियोजन माहीत असूनही ते पोलिसांपासून किंवा इतरांपासून लपवून ठेवल्यामुळे, या संपूर्ण गुन्ह्यात या तरुणाची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास आता पोलिसांकडून अत्यंत गांभीर्याने सुरू आहे. त्याने आरोपींना काही तांत्रिक किंवा इतर मदत केली होती का? याचाही शोध घेतला जात आहे.
(नक्की वाचा- IAS Transfer : राज्यात प्रशासकीय फेरबदल! 3 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या)
या प्रकरणाच्या तपासातून येत्या काही दिवसांत आणखी अनेक महत्त्वाचे आणि मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या नव्या आरोपीला पोलीस कधी ताब्यात घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world