जाहिरात

विशाळगड हिंसाचार प्रकरण; 17 जणांना जामीन मंजूर, तर 7 जणांचे जामीन फेटाळले

Kolhapur News : 14 जुलै रोजी विशाळगड परिसरातील गाजापूर भागात एका जमावने आक्रमक होत तोडफोड केली होती. त्यानंतर या सर्व संशयित आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

विशाळगड हिंसाचार प्रकरण; 17 जणांना जामीन मंजूर, तर 7 जणांचे जामीन फेटाळले

विशाल पुजारी, कोल्हापूर

कोल्हापुरातील विशाळगड हिंसाचारप्रकरणी अटकेतील 17 जणांना जमीन मंजूर झाला आहे. तर सात जणांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या संपूर्ण प्रकरणात एकूण पाच गुन्हे नोंदवण्यात आले होते. यापैकी 24 जणांना अटक करण्यात आली होती. 

कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश ए पी गोंधळेकर यांनी याबाबत सुनावणी केली. जामीन अर्ज फेटाळण्यात आलेले सातही जण उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे प्रकरण? 

14 जुलै रोजी विशाळगड परिसरातील गाजापूर भागात एका जमावने आक्रमक होत तोडफोड केली होती. त्यानंतर या सर्व संशयित आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.  यातील 24 जणांना अटक केलेली होती. 15 जुलैपासून सर्व संशयित आरोपी अटकेत होते. 

(नक्की वाचा-   'शाह, फडणवीसांचे आश्वासन, आता खूप वेळ झाला, पंधरा दिवस थांबणार नाही तर...')

जिल्हा सत्र न्यायालयाने यातील 17 जणांना जामीन मंजूर केला. तर उर्वरित सात जणाचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. हे सातही जणांचे तोडीफोडीवेळीचे फोटोत दिसत असल्यामुळे यांचा जामीन मंजूर झालेला नाही. ज्यांचा जामीन मंजूर झालेला नाही ते सर्वजण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती वकिलांनी दिली.

जामीन नामंजूर झालेल्यांची नावे 

चेतन आनंदराव जाधव (वय 30), ओंकार दादा साबळे (21), सूरज माणिक पाटील (21), आदित्य अविनाश उलपे (29), ओंकार तुकाराम चौगुले (21, सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर), ओंकार सुनीलसिंह राजपूत (29, रा. जाधववाडी, कोल्हापूर) आणि -सिद्धार्थ धोंडिबा कटकधोंड (30, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) अशी जामीन नामंजूर झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com