जाहिरात

'शाह, फडणवीसांचे आश्वासन, आता खूप वेळ झाला, पंधरा दिवस थांबणार नाही तर...'

आपल्याला राज्यपाल करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिले होते.

'शाह, फडणवीसांचे आश्वासन, आता खूप वेळ झाला, पंधरा दिवस थांबणार नाही तर...'
अमरावती:

विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. निवडणुकीची घोषणा कधीही होवू शकते. अशात काही नेते प्रचंड आक्रमक झालेले दिसत आहेत. दिलेली आश्वासने कधी पुर्ण होणार? अशी विचारणा ते करत आहेत.  शिंदे गटाते जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी तर आता थेट इशारा देत शिंदें समोरच अडचण निर्माण केली आहे. आपल्याला राज्यपाल करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिले होते. पण आश्वासन देवून काही झाले नाही. काही गोष्टींसाठी मर्यादा असतात. त्यामुळे अजून पंधरा दिवस वाट पाहाणार त्यानंतर मात्र, आपण काय करणार आहोत  हेच अडसूळ यांनी जाहीर केले आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आनंदराव अडसूळ हे शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदार संघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी त्यांनी केली होती. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध होता. मात्र त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली. अमरावतीची जागा भाजपच्या ताब्यात गेली. तिथे राण यांचा पराभवही झाला. त्या वेळी अडसूळ यांना राज्यपालपदाचे आश्वासन देण्यात आले होते. हे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय तसाच शब्द देवेंद्र फडणवीस यांनीही दिला होता असेही त्यांनी सांगितले. पण याला आता खूप वेळ झाला आहे. आश्वासन पूर्ण झालेले नाही असे अडसूळ म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत, ठाकरेंचा दिल्ली दौरा महत्वाचा का?

एकाद्या गोष्टीला मर्यादा असतात. त्यामुळे फडणवीसांनी आश्वासन देवून पंचवीस महिने झालेत. तर अमित शाहांच्या आश्वासनाला अडीच महिने होवून गेलेत. पण आश्वासही हे आश्वासनच राहीले आहे. आता आपण अधिक काळ वाट पाहाणार नाही. अजून पंधरा दिवस वाट पाहू असे अडसूळ यांनी स्पष्ट केले. शिवाय त्यानंतर अमरावती लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या नवनीत  राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयातही जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राणा यांच्या जात प्रमाणपत्रा बाबत जो निर्णय आला आहे तो चुकीचा पायंडा पाडणारा आहे असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Maratha Reservation : 'आमच्या आंदोलनाचा शेवट शरद पवारांच्या घरावर'; फडणवीसांच्या भेटीनंतर केरेंचा हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीत अमरावती अमरावती जिल्ह्यातील तीन जागा मागू घेणार असल्याचे आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केल. त्यात बडनेरा, तिवसा आणि दर्यापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या जागा या आधी शिवसेना लढली आहे. त्यामुळे त्या यावेळी मिळाल्याच पाहीजेत असा दबाव आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आणू असेही अडसूळ यावेळी म्हणाले. बडनेरामध्ये रवी राणा हे सध्या आमदार आहेत.ते महायुतीचा घटक आहेत. अशा वेळी रवी राणांशी आपलं काही देणेघेणे नाही असेच अडसूळ म्हणाले आहे. बडनेरा हा शिवसेनाला मिळालाच पाहीजे असा आपला आग्रह असल्याचे ते म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Delhi New CM : आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, एकमताने झाली निवड
'शाह, फडणवीसांचे आश्वासन, आता खूप वेळ झाला, पंधरा दिवस थांबणार नाही तर...'
Sanjay raut claim Mahavikas Aghadi Consensus regarding the allocation of seats in the Legislative Assembly in Mumbai
Next Article
मोठी बातमी! मविआचं जागा वाटप ठरलं, मुंबईतल्या 99 टक्के जागांवर सहमती