CCTV Footage : कुर्ल्यात भरधाव बेस्ट बस गर्दीत शिरली, 7 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

Kurla Accident : जखमींवर कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार 25 जखमींची नोंद झाली आहे. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीचा उपचारानंतर मृत्यू झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री अनियंत्रित बेस्ट बसने कहर केला. गर्दीच्या वेळी रस्त्यावर भरधाव बेस्ट बसने काही वाहनांना धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 25 जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. 

सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

(नक्की वाचा- Kurla Bus Accident : बेस्ट बस गर्दीत घुसली, कुर्ला LBS मार्गावर मोठा अपघात)

बेस्ट इलेक्ट्रिक बस जी कुर्ला स्टेशन (पश्चिम) ते LBS रोड कडे जाते होती. मात्र बस अनियंत्रित झाल्याने 25 विविध प्रकारच्या वाहनांना धडक दिली. पुढे जाऊन एका इमारतीची भिंत तोडून एका RCC कॉलमवर धडकली. रस्त्यावरील आणि वाहनांमधील 7 जण मृत्यूमुखी पडले आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

जखमींना कुर्ल्यातील भाभा रुग्णालय, राजावाडी, सायन रुग्णालय आणि इतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाभा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार 25 जखमींची नोंद झाली आहे. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीचा उपचारानंतर मृत्यू झाला आहे. 

Advertisement

बसचा चालक ताब्यात

पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितलं की, "कुर्ल्यात अनियंत्रित बेस्ट बसने काही वाहनांना चिरडले. 25 जण जखमी झाले तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसच्या चालकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. 

Topics mentioned in this article