
मुंबईत सोमवारी (9 डिसेंबर) रोजी रात्री दहाच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. मुंबईतील मध्यवर्ती भागातील कुर्ला कुर्ला एलबीएस मार्गावर मोठा अपघात झाला आहे. कुर्ला स्टेशन बस डेपोमधून निघालेली इलेक्ट्रिक बस भरधाव वेगाने गर्दीत घुसली. यावेळी कित्येक नागरिक बसखाली चिरडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
रात्री उशीरपर्यंत या भागात बरीच वर्दळ असते. मार्केटमध्ये भरधाव वेगाने घुसलेल्या बेस्ट बसने अनेकांना धडक दिल्याची माहिती आहे. बसचा ब्रेक फेल झाला होता अशी प्राथमिक माहिती आहे. वर्दळीच्या भागात अचानक हा अपघात झाल्यानं एकच गोंधळाचं वातावरण होतं.
कुर्ला बस दुर्घटनेत 20 जण जखमी झाले असून जखमींमघ्ये अनेक जण चिंताजनक स्थितीत आहेत. बस अचानक वेगाने आली त्यामुळे अनेक जण चिरडले गेले. बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. या अपघातात पोलिससुद्धा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली आहे.
#WATCH | Mumbai: 3 people died and 20 injured after an intracity bus going from Kurla to Andheri crushed several vehicles and people on the road. https://t.co/Jsg7RWPghN pic.twitter.com/LxduF025Ro
— ANI (@ANI) December 9, 2024
100 मीटर अंतरावरच्या 30 ते 40 विविध वाहनांना या बसनं उडवलं असल्याची माहिती आहे. या अपघातामधील जखमींना कुर्लामधील भाभा शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींमधील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
332 क्रमांकाच्या बसला अपघात
या अपघाताबाबात मिळालेल्या माहितीनुसीार बस क्रमांक 332 च्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. ही बस सुरुवातीला चालत असलेल्या नागरिकांना धडकली. त्यानंतर बसनं काही वाहनांना उडवलं. ही बस सोसायटीच्या गेटला धडकल्यानं थांबली. ही बस कुर्लाहून अंधेरी स्टेशनला जात होती. त्यावेळी बुद्धा कॉलनीमधील आंबेडकर नगरमध्ये हा अपघात झाला.
सोमवारी रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी हा अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना सायन आणि कुर्लामधील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world