
Lalbaugcha raja 2025 first look : नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाला पाहण्यासाठी अवघ्या काही तासांची प्रतीक्षा आहे. ज्याचं मुखदर्शन घेऊन मन प्रसन्न होतं, ज्याच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक लालबागला येत असतात, अशा लालबागच्या राजाचं दर्शन अवघ्या काही तासात घेता येणार आहे.
दरवर्षी गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2025) दोन दिवस आधी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून राजाची पहिली झलक दाखविली जाते. यावेळीही मोठ्या संख्येने भाविक राजाच्या दर्शनाला येण्याची शक्यता आहे. लवकरच भाविकांना लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घडणार आहे.
कधी आणि कुठे होणार लालबागच्या राजाची पहिली झलक l lalbaugcha raja 2025 first look date and time
दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून बुधवार दिनांक २७ ऑगस्ट ते शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या जल्लोषात बाप्पाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या गणेशोत्सव सोहळ्यापूर्वी लालबागच्या राजाची पहिली झलक पाहता येणार आहे. आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागचा राजा २०२५ चे प्रथम दर्शन घडविणार आहे.
लालबाच्या राजाची पहिली झलक https://www.youtube.com/@LalbaugRaja या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world