
Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाचा यंदाचा विसर्जन सोहळा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला. तब्बल 36 तासांनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन पार पडले. विसर्जन वेळेमध्ये न होण्यामागील वेगवेगळी कारणं समोर येत आहेत. दुसरीकडे चंद्र ग्रहण काळादरम्यान विसर्जन झाल्यानं गणरायाच्या भाविकांनी मोठी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांविरोधातही राग व्यक्त केला जातोय. सोशल मीडियावरील व्हायरल मेसेज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यातील काही निवडक मेसेज पाहुया....
लालबागचा राजा विसर्जन 2025 | Lalbaugcha Raja Visarjan 2025 Viral Messages
1. "शेवटी जाता जाता राजाने सिद्ध केलं की तो नुसता श्रीमंत माणसाचा नसून सामान्य माणसाचाही आहे."
2. "लालबागच्या राजाने आज हे सिद्ध केले की तो गोरगरीब जनतेचा राजा आहे. भक्तिभाव बाजूला करून तुम्ही देवाला खूश करू शकत नाही. राजा प्रजेतच शोभून दिसतो."
3. "आज राजाने एक शिकवण दिली. चांगल्या काळात लाखो लोक सोबत असतील... पण कठीण काळात शेवटपर्यंत फक्त आपलेच लोक असतात..."
4. "शेवटी राजासोबत सामान्य माणसंच आहेत आणि नेहमी राहतील.
#पुढच्यावर्षीलवकरया"
(नक्की वाचा: लालबागचा राजा पैशांचा बाप्पा झालाय! वर्षानुवर्षे सेवा करणारे कोळी बांधव मंडळावर संतापले)
5. "लालबागच्या राजाची लिला अगाध !
तास-न्-तास रांगेत उभं राहणाऱ्या सामान्य नागरिकांना पाण्यात पाहणाऱ्या आणि श्रीमंतांना पायघड्या घालणाऱ्या, डोक्यात हवा गेलेल्या VVIP कार्यकर्त्यांना राजानेच पाण्यात खिळवून ठेवलंय !!"
6. "आज मला जाणवलं आणि उमगलं की देव कधीच पैशाने विकत घेता येत नाही."
7. "विसर्जनाच्या वेळी हे VIP Entry वाली लोक कुठे जातात?"
(नक्की वाचा: Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांची लालबागच्या राजाबद्दल पोस्ट अन् मराठीचा मुद्दा, भाषा शिकण्याबाबत काय म्हणाले?)
8. "मंडळ विकलं गेलंय पण तू आम्हाचाच आहेस!"
9. "परीक्षा घेऊन चालला आहेस आणि रडवून सुद्धा"
10. "लालबागच्या राज्याने सुद्धा दाखवून दिलं की, फक्त श्रीमंती किवा सत्ता असून चालत नाही, मनामध्ये भावना आणि प्रेम सुद्धा असावं लागतं ..!!"
11. लालबागच्या राजाचे विसर्जन उशीराने का झालं माहितीये, असे म्हणते या युजरने खालील व्हिडीओ शेअर केलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world