Lalbaugcha Raja 2025: 'लालबागचा राजा'चं अखेरचं मुखदर्शन कुठे घेता येईल? असा असेल विसर्जन मिरवणुकीचा मार्ग

Lalbaugcha Raja 2025 Visarjan Schedule : लालबागचा राजाच्या विसर्जनाचा प्रवास लालबाग मंडळातून सुरू होऊन थेट गिरगाव चौपाटीवर संपेल. विसर्जन मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग आणि वेळापत्रक खालीलप्रमाणे पाहूया.

जाहिरात
Read Time: 2 mins

Lalbaugcha Raja 2025 Visarjan Schedule and Route : 'लालबागचा राजा'चं दर्शन मिळालं नाही असे असंख्य भाविक लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी मुंबईत दाखल होतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक काढली जाते. यंदाच्या वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि वेळ जाहीर करण्यात आला आहे, जेणेकरून भक्तांना सोयीस्करपणे बाप्पाचे दर्शन घेता येईल.

लालबागचा राजाच्या विसर्जनाचा प्रवास लालबाग मंडळातून सुरू होऊन थेट गिरगाव चौपाटीवर संपेल. विसर्जन मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग आणि वेळापत्रक खालीलप्रमाणे पाहूया.

(नक्की वाचा-  Lalbaugcha Raja: रेमंडच्या गौतम सिंघानियांचं लालबागच्या राजाला भरूभरून दान, VIDEO व्हायरल)

विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि वेळापत्रक

लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सकाळी 10 ते 12 या वेळेत मंडळाच्या जागेतून होईल. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात राजाचा प्रवास सुरू होईल. दुपारी 1 ते 2 या वेळेत राजा चिंचपोकळी रेल्वे पुलावर पोहोचेल. या ऐतिहासिक ठिकाणी पूल आणि खाली दोन्ही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते.

पुढे, दुपारी 3 ते 5 या वेळेत राजाचा प्रवास भायखळा स्टेशनच्या दिशेने होईल. त्यानंतर नागपाडा चौकात रात्री 7 ते 9 या वेळेत राजा पोहोचेल. गोल देऊळ राजाची मिरवणूक रात्री 10 ते 12 या वेळेत पोहोचेल. ऑपेरा हाऊस पूल याठिकाणी पहाटे 2 ते 4 या वेळेत लालबागचा राजा पोहोचेल.

(नक्की वाचा-  Mumbai News: अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर 'ह्युमन बॉम्ब' स्फोटाची धमकी, पोलीस हाय अलर्टवर)

त्यानंतर अखेरचा टप्प्यात गिरगाव चौपाटीवर 7 सप्टेंबरच्या पहाटे 5 ते 7 वाजेच्या दरम्यान लालबागच्या राजाचे विसर्जन अरबी समुद्राच्या होईल. (Arabian Sea) लाटांमध्ये गिरगाव चौपाटीवर होईल. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतानाचा हा क्षण अत्यंत भावनिक असतो.

Advertisement