
Gautam Singhania at Lalbaugcha Raja: प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी नुकतेच आपल्या संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी, त्यांनी बाप्पाच्या चरणी मोठे दान अर्पण केले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये आणि सोशल मीडियावर विशेष चर्चा सुरू झाली आहे. या दानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून 'लालबागचा राजा' मंडळाला देशातून आणि परदेशातून मोठे दान मिळत आहे. मात्र, यावर्षी गौतम सिंघानिया यांनी केलेल्या दानाची पद्धत आणि रक्कम चर्चेचा विषय बनली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सिंघानिया यांनी 500 रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल दान केले.
(नक्की वाचा- Lalbaugcha Raja 2025: मिया खलिफालाही दर्शनाला बोलवा! लालबागचा राजाच्या VIP दर्शनावर Insta Influencer संतापला)
VIDEO | Raymond Chairman Gautam Singhania (@SinghaniaGautam) take blessings from Ganpati Bappa at Lalbaugcha Raja pandal in Mumbai.#GaneshChaturthi #LalbaugchaRaja2025 pic.twitter.com/vBIxhxmW0j
— Press Trust of India (@PTI_News) September 3, 2025
देणगी किती होती?
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, गौतम सिंघानिया यांनी आणलेल्या पिशवीतून कार्यकर्त्यांनी एकामागून एक 500 रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल बाहेर काढले आणि दानपेटीत टाकले. ही नेमकी किती रक्कम होती, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मंडळाने जाहीर केलेली नाही. तरीही, ते दान लक्षणीय असल्याचे मानले जात आहे.
(नक्की वाचा- बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज; सुरक्षित विसर्जनासाठी BMC ने दिल्या महत्त्वाच्या सूचना)
'लालबागचा राजा' हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील भाविकांसाठी श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान अनेक राजकारणी, अभिनेते, खेळाडू आणि उद्योजक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. तासन्तास रांगेत उभे राहून बाप्पाचे दर्शन घेणारे सामान्य भाविकही येथे मोठ्या संख्येने असतात. पण यावर्षी सिंघानिया यांनी केलेल्या या मोठ्या दानामुळे यंदाच्या उत्सवात त्याची विशेष चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world