Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार

Pune-Nashik Highway : नाशिकमधील कृषी बाजारपेठा आणि पुण्यातील औद्योगिक कंपन्यांना विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

पुणे-नाशिकमधील नागरिकांनासाठी गुड न्यूज आहे. पुणे-नाशिक या दोन शहरांमधील अंतर कमी होणार आहे. सरकारने पुणे-नाशिक हरित महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी केली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया ही दोन वर्षांपासून रखडलेली होती. अखेर सरकारने यासाठी मंजुरी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. 134 किलोमीटर लांबीचा हरित महामार्ग पुणे आणि नाशिक या दोन शहरांमधील अंतर कमी करणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ दोन ते अडीच तासांनी कमी होणार आहे. 

(नक्की वाचा-  Govt Employee : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय)

नाशिकमधील कृषी बाजारपेठा आणि पुण्यातील औद्योगिक कंपन्यांना विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून योग्य तो तोडगा काढला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 1545 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

(नक्की वाचा- सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल आला समोर)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी सुमारे 15 हजार 696 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे पुणे आणि नाशिकमधील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच, औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

Advertisement

Topics mentioned in this article