Leopard in Thane: ठाणेकर दहशतीत! 'तो' VIDEO व्हायरल झाल्यानंतर वनविभागाचे सतर्क राहण्याचं आवाहन

Thane News: कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बिबट्याचा व्हिडिओ शूट करून स्थानिक पोलिसांना दिला होता. या माहितीची गंभीर दखल घेत वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो

रिजवान शेख, ठाणे

Thane Leopard News:  पुणे, अहिल्यानगर, रायगडनंतर आता ठाण्यात बिबट्या दिसल्याने ठाणेकर दहशतीत आहेत. ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक 2 येथील बेथनी हॉस्पिटलच्या मागील परिसरात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वर्तकनगर पोलीस आणि वनविभागाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली आहे.

व्हिडिओ आणि वनविभागाची कारवाई

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बिबट्याचा व्हिडिओ शूट करून स्थानिक पोलिसांना दिला होता. या माहितीची गंभीर दखल घेत वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ठाणे रेंज फॉरेस्ट ऑफिसर नरेंद्र मोठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारा परिसर हा बेतनी हॉस्पिटलच्या मागील भाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. व्हिडिओ सकाळी शूट करण्यात आला असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

वनविभागाने घेतलेली खबरदारी

व्हिडिओमध्ये दिसणारा प्राणी नेमका बिबट्याच आहे का, याची खात्री करण्यासाठी वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. बिबट्या दिसल्यास काय करावे आणि काय करू नये, याबद्दल स्थानिक नागरिकांना सुरक्षेचे धडे देण्यात आले आहेत. वनविभागाचा स्टाफ आणि पोलीस या भागात सातत्याने गस्त घालत आहेत.

नरेंद्र मोठे म्हणाले, "व्हिडिओमधील प्राणी बराच लांब असल्याने तो बिबट्याच आहे असे 100 टक्के सांगणे कठीण आहे. तरीही आम्ही खबरदारी घेत आहोत. मीरा-भाईंदरमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडू नये, यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. नागरिकांनी घाबरू नये, मात्र सतर्क राहावे."

Advertisement

Topics mentioned in this article