जाहिरात
6 hours ago
मुंबई:

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार (Central Election Commission) परिषदेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) तारखा जाहीर करण्यात आल्या. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निकाल समोर येतील. या पत्रकार परिषदेनंतर राज्यभरात आचारसंहिता लागली आहे. दरम्यान महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. अद्याप दोन्ही गटांनी किती जागांवर निवडणूक लढवणार याबाबत माहिती दिलेली नाही. पुढील काही दिवस राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात.   

अमरावतीच्या चित्रा चौकातील हत्या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या

अमरावतीच्या चित्रा चौकातील हत्या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या. विकी गुप्ता व योगेश गरुड अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. 

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले यांची नियुक्ती

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले यांची नियुक्ती

आशिष दामले हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आणि बदलापूरचे माजी नगरसेवक आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी  दामले यांचं अभिनंदन केलं. ब्राह्मण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारकडून परशुराम आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली होती. 

अजित पवार गटाचे उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट

अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आणि शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट 

गुटख्याची अवैध वाहतूक करत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन जण ताब्यात

राज्यामध्ये बंदी असलेला गुटख्याची अवैध वाहतूक करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे पाच लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, परभणी जिल्ह्यातील पडेगाव पाटी जवळ ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये दोन जणांना मुद्देमाला सोबत चारचाकी गाडीसह ताब्यात घेण्यात आले आहे. 

शेती विजेकरिता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य - फडणवीस

शेती विजेकरिता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. या कंपनीअंतर्गत सोलरच्या माध्यमातून 14 हजार मेगावॅट वीजनिर्मिती काम सुरू केलं. पुढील 15 ते 18 महिन्यात सगळं काम पूर्ण होईल. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना वर्षभर  दिवसा वीज उपलब्ध करून देऊ.  हा क्रांतिकारी निर्णय आणि काम आम्ही सुरू केलंय. त्यामुळे जी वीज 8.50 रुपयांना पडत होती ती केवळ 3 रुपयांना पडणार आहे. 

- देवेंद्र फडणवीस 

जम्मू काश्मीर : ओमर अब्दुल्लांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, सुरिंदर चौधरी झाले उपमुख्यमंत्री

जम्मू काश्मीर : ओमर अब्दुल्लांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, सुरिंदर चौधरी झाले उपमुख्यमंत्री 

आचारसंहिता लागली, महायुतीचं जागावाटप जाहीर करणार? संयुक्त पत्रकार परिषद

Live Update : मुंबईच्या रिया पॅलेसमध्ये भीषण आग, तिघांचा मृत्यू

मुंबईच्या अंधेरी स्थित रिया पॅलेसमध्ये भीषण आग लागल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन वृद्ध आणि त्यांचा मदतनीस होता. त्या घरात दोन वृद्ध आणि त्यांचा मदतनीस असेल तिघेजण राहत होते. वृद्धाचा मुलगा परदेशात राहत होता. 

Live Update : : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्याच कसोटीत पावसामुळे टॉसला विलंब

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्याच कसोटीत बंगळुरूच्या एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर पावसामुळे टॉसला विलंब, पावसामुळे खेळात येणार व्यत्यय

Live Update : अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आग

अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये काही जणं जखमी झाल्याची माहिती आहे. 

Live Update : पुणे जिल्हा विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची तयारी सुरू

पुणे जिल्हा विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची तयारी सुरू झाली आहे. मनसे नेते अमित ठाकरे स्वतः पुण्यातील विधानसभांचा आढावा घेणार आहे. अमित ठाकरे आज आणि उद्या दोन दिवस पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांचा अमित ठाकरे आढावा घेणार. याआधी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आता अमित ठाकरे पुण्यात येत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

Live Update : मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली

मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली. चिपळून जवळील परशुराम घाटातील संरक्षक भिंत मध्यरात्री कोसळली. मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाचा दर्जा पुन्हा एकदा आला आहे. सध्या या महामार्गावरची वाहतूक एकेरी लाईनमध्ये सुरू 

मनोज जरांगे यांच्याकडे उमेदवारीसाठी 800 अर्ज

मनोज जरांगे यांच्याकडे उमेदवारीसाठी 800 अर्ज

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते ते राजकीय पटलावर ताकद दाखविणाऱ्या मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे केले तर आपणही त्यात असावे असे वाटणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाने आंतरवाली सराटीमध्ये गर्दी झाली आहे. आतापर्यंत राज्यातून 800 हून अधिक अर्ज आले असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

Previous Article
रवीना टंडनवर झालेला हल्ला होता नियोजनबद्ध कटाचा भाग, अभिनेत्रीनं केला धक्कादायक गौप्यस्फोट
Live Update : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले यांची नियुक्ती
shivsena-mla-response-to-union-home-minister-amit-shah-on-cm-eknath-shinde-remarks
Next Article
'धाडसी आणि क्रांतीकारक उठावाची जाणीव ठेवा', शिंदेंच्या आमदारांनी अमित शाहांना सुनावलं?