जाहिरात
1 month ago
मुंबई:

नवी दिल्लीत रात्री उशीरापर्यंत महायुतीची (Vidhan Sabha Election) बैठक पार पडली. तब्बल अडीच तास बैठक सुरू होती. बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. अमित शाह यांच्यासमोर जागावाटपाचा तिढा सुटलाचं सांगितलं जात आहे. जवळपास सर्वच जागांचा तिढा सुटला असून काही जागांचा निर्णय आजच्या बैठकीत झाला नसल्याची माहिती आहे. मात्र त्या जागांचा निर्णय राज्यातील नेत्यांनी एकत्र बसून तिथेच सोडवण्याच्या शाह यांनी सूचना दिल्या आहेत. निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागण्याचे शाह यांनी निर्देश दिले आहेत. प्रचाराचे मुद्दे, जाहीरनामा आणि प्रचार सभा यावरही बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 


 

वसई विरारसह पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

वसई विरारसह पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी. विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस, आठवडाभरापासून  पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. परती पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. वसई विरार परिसरातही अनेक ठिकाणी बत्ती गुल.

लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे यांची महत्वाची माहिती

लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे यांचं ट्वीट

NHAI चा नाशिक मुंबई महामार्गवरील टोल वसुली करणाऱ्या कंपनीला दणका

NHAI चा नाशिक मुंबई महामार्गवरील टोल वसुली करणाऱ्या कंपनीला दणका. 

वडपे ते गोंदे या रस्त्याची  दुरुस्ती न केल्याने 95 दिवस वसुली करण्यास मनाई.

20 ऑक्टोबर ते 23 जानेवारी या कालावधीत करता येणार नाही वसुली.

NHAI कडून स्वतः केली जाणार वसुली. 

वसुलीतून होणाऱ्या रकमेतून रस्त्यांची केली जाणार डागडुजी.

ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला पहिल्यांदाच लागणार चाप.

नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर दखल.

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी : CM एकनाथ शिंदे

राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसापरतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.मुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यातील विविध भागांमध्ये अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजली आहेत. 

विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. 

या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

पंचनामे आणि नुकसान भरपाईसाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे निदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 

जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुकास्तरीय यंत्रणा, इतर सर्व संबंधित विभाग यांनी यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

वंचित बहुजन आघाडीची चौथी यादी जाहीर, नव्या यादीत 16 उमेदवारांचा समावेश

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर

पुण्यात एका नामांकित सोने व्यापाऱ्याला लॉरेन्स बिष्णोई गँगचं नाव वापरत खंडणीचा मेल

पुण्यात एका नामांकित सोने व्यापाऱ्याला लॉरेन्स बिष्णोई गँगचं नाव वापरत खंडणीचा मेल 

नामांकित सोने व्यापाऱ्याला मागितली 15 करोड रुपयांची खंडणी 

तीन दिवसांपूर्वी खंडणीचा मेल, पुणे सायाबर पोलीसांकडून तपास सुरु.

शिवसेना ठाकरे गटाच्या एकूण 43 उमेदवारांना मातोश्रीवरून उमेदवारी संदर्भात ग्रीन सिग्नल

शिवसेना ठाकरे गटाच्या एकूण 43 उमेदवारांना मातोश्रीवरून उमेदवारी संदर्भात ग्रीन सिग्नल. गेल्या तीन दिवसापासून ठाकरे गटातील विद्यमान आमदारांनी आणि इच्छुक उमेदवारांनी मातोश्रीवर भेट घेतली. त्यामध्ये या उमेदवारांना उमेदवारी संदर्भात स्पष्ट निश्चिती देण्यात आली आहे. याची संख्या जवळपास 43 आहे. पहिल्या दिवशी विद्यमान 12 आणि अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांच्यासह इच्छुक 6 सह एकूण 19 जणांना मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. तर काल विविध पक्षातून पक्ष प्रवेश केलेल्या आणि विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांच्यासह एकूण 14 उमेदवारांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. तर उर्वरित उमेदवारांना आज मातोश्रीवरून ग्रीन सिग्नल दिला असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. लवकरच या उमेदवारांना एबी फॉर्म घेण्यासाठी निरोप देण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं आहे.

गणेश नाईकांनी मध्यरात्री घेतली जयंत पाटील यांची भेट - सूत्र

गणेश नाईकांनी मध्यरात्री घेतली जयंत पाटील यांची भेट - सूत्र

आज संध्याकाळपर्यंत नाईक कुटुंबीय पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. इतर नगरसेवक आणि पदाधिकारी नंतर प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. 

Live Update : फोडा आणि राज्य करा हे भाजप आणि काँग्रेसचे समान धोरण - प्रकाश आंबेडकर

Live Update : अभिनेता पुष्कर जोगच्या NDTV ला शुभेच्छा

Live Update : बँक कर्मचारी 16 नोव्हेंबरला एक दिवसासाठी लाक्षणिक संपावर

महाराष्ट्रातील बँक कर्मचारी 16 नोव्हेंबरला एक दिवसासाठी लाक्षणिक संपावर जाणार आहे. बँक कर्मचारी यांना पुरेसं संरक्षण देण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर जाणार आहेत. लाडकी बहीण योजना अंमलबजावणीबाबत राज्य सरकार आणि बँकांनी कुठलेही नियोजन केले नसल्याचा आरोप असून 

लाभार्थी महिलांची खाते उघडण्यासाठी गर्दी लोटली आणि केवायसीला गर्दी झाली झाली आहे.  

BMC आयुक्त भूषण गगराणी यांनी NDTV मराठीला दिल्या खास शुभेच्छा

अभिनेता गष्मीर महाजनीने केलं NDTV मराठीचं कौतुक

पुण्यात अभ्यासिकेला आग; हजारो पुस्तक, विद्यार्थ्यांची कागदपत्र, शेकडो लॅपटॉप जळून खाक

पुण्यात अभ्यासिकेला आग; हजारो पुस्तक, विद्यार्थ्यांची कागदपत्र, शेकडो लॅपटॉप जळून खाक

पुण्याच्या नवी पेठ परिसरात असणाऱ्या एका खाजगी अभ्यासिकेला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी 7 च्या सुमारास घडलीय. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी अभ्यासिकेचे  मोठे नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. या आगीत हजारो पुस्तकं, विद्यार्थ्यांचे 100 पेक्षा अधिक लॅपटॉप, मोबाईल फोन पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा देखील सुरू आहे. शेकडो विद्यार्थी या अभ्यासिकेत रोज अभ्यासाला येतात आणि विद्यार्थ्यांचे बरंच सामान या अभ्यासिकेत असतं. आज आग लागल्यानंतर विद्यार्थ्यांची अनेक कागदपत्रे देखील आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. विद्यार्थ्यांच्या या अभ्यासिकेत आता केवळ जळालेली पुस्तक आणि राख उरलेली पाहायला मिळत आहे ..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणुकीच्या रणधुमाळी पूर्वीच एकनाथ शिंदे कामाख्या देवीचं दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. 

कामाख्या देवीचं दर्शन घेऊन एकनाथ शिंदे प्रचार सुरू करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं.

NDTV मराठीची घोडदौड सुरूच राहणार, सुप्रिया सुळेंकडून शुभेच्छा

अभिनेत्री रुचा वैद्यच्या NDTV मराठीला शुभेच्छा...

Vidhan Sabha Election : उद्धव ठाकरे गटाचे 33 उमेदवार जवळपास निश्चित...

IND vs NZ 1 Test Live: बंगळुरू टेस्टमध्ये मुंबईकर सर्फराजची दमदार सेंच्युरी

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या टेस्टमधील चौथ्या दिवशी सर्फराज खाननं सेंच्युरी झळकली. सर्फराजची टेस्ट कारकिर्दीतील ही पहिलीच सेंच्युरी आहे. शुबमन गिल अनफिट असल्याने सर्फराजचा Playing 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. टीमला गरज असताना सेंच्युरी झळकावत त्यानं या संधीचं सोनं केलं.

अजित पवार यांची आजपासून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात

अजित पवार आजपासून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. अजित पवारांची पहिली सभा आज नाशिकच्या त्रंबकेश्वरमध्ये होणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या आमदार हिरामण खोसकर यांच्यासाठी अजित दादांची आज सभा आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात आज अजित पवारांची तोफ धडधडणार आहे. आज होणारी सभा प्रचार ही प्रचार सभा नसून विजयी सभा असल्याची हिरामण खोसकर यांनी प्रतिक्रिया दिली. 

अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक चव्हाण भोकर विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावणार!

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक चव्हाण ही चव्हाण परिवाराच्या परंपरागत भोकर विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावतेय. यावेळी पहिल्यांदा श्रीजया निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. सतत एसी मध्ये थाटात राहणारी मुलगी थेट वाडी तांड्यावर फिरू लागली आहे. लोकांचाही प्रतिसाद मिळतोय आणि श्रीजयाला स्वतःच्या विजयाचा विश्वास वाटतोय 

Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पैलवान हे गाणे आणि पोस्टर होणार प्रदर्शित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पैलवान हे गाणे आणि पोस्टर प्रदर्शित होणार आहे. हा कार्यक्रम मंत्रालयासमोरील एनसीपी कार्यालयात पार पडणार आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांची काल दिल्लीत बैठक झाली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत संपली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या गाण्याच्या लॉन्चिंगला उपस्थित राहणार का हे बघणं महत्त्वाचे आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com