जाहिरात

Ravindra Chavan: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोठी फिल्डिंग! रविंद्र चव्हाणांचा विदर्भात 2 दिवस मुक्काम

Nagpur Graduate Election: नागपूर पदवीधर मतदारसंघाची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

Ravindra Chavan: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोठी फिल्डिंग! रविंद्र चव्हाणांचा विदर्भात 2 दिवस मुक्काम
Ravindra Chavan : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विदर्भाचा दोन दिवसांचा दौरा केला.
नागपूर:

Nagpur Graduate Election: नागपूर पदवीधर मतदारसंघाची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विदर्भाचा 2 दिवसीय दौरा करत संघटनात्मक बैठकांचा धडाका लावला. विदर्भातील तब्बल 8 प्रमुख संघटनात्मक जिल्ह्यांचा आढावा घेत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा नवा उत्साह भरला असून, या दौऱ्यानंतर भाजपाची निवडणूक यंत्रणा पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.

8 जिल्ह्यांचा आढावा अन् निष्ठावंतांचा सन्मान

आपल्या या 2 दिवसीय दौऱ्यात रविंद्र चव्हाण यांनी नागपूर ग्रामीण (रामटेक), चंद्रपूर महानगर व ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर महानगर, काटोल आणि वर्धा या जिल्ह्यांच्या बैठका घेतल्या. निवडणूक नियोजन आणि संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत त्यांनी कार्यकर्त्यांना नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे मार्गदर्शन केले. 

चंद्रपूरमधील बैठकीत ब्रह्मपुरी येथील 1980 पासून पक्षासाठी काम करणाऱ्या प्रा. शेख सर यांचा चव्हाण यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रा. शेख सर यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते हा भाजपचा खरा आधारस्तंभ असून त्यांच्या संघर्षातूनच पक्षाचा वटवृक्ष उभा राहिल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.

Latest and Breaking News on NDTV

वरिष्ठ नेत्यांच्या भेटी अन् कार्यकर्त्यांशी थेट संवाद

दौऱ्यादरम्यान चव्हाण यांनी रामटेकचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, आमदार कीर्तिकुमार भांगडीया, माजी आमदार अतुल देशकर, ज्येष्ठ नेते किसन नागदेवे, माजी आमदार कृष्णा गजभिये आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या निवासस्थानी व कार्यालयांना सदिच्छा भेटी दिल्या. या भेटींदरम्यान त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. 

या संपूर्ण दौऱ्यात मंत्री डॉ. अशोक उईके, पालकमंत्री पंकज भोयर, प्रदेश सरचिटणीस आमदार संजय कुटे, आमदार प्रवीण दटके, आमदार किशोर जोरगेवार, माजी खासदार हंसराज अहिर, सुनील मेंढे यांच्यासह विदर्भातील भाजपचे अनेक आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचाच विजय होणार'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विदर्भात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यभूमी असून विदर्भ हा भाजपाचा भक्कम बालेकिल्ला राहिला आहे. 

या दौऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास पाहायला मिळाला. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचाच विजय होईल, असा ठाम विश्वास प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com