2 days ago

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025)  10 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar)  हे राज्याचा अर्थसंकल्प मांडतील. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याच्या आर्थिक स्थितीचे दर्शन घडविणारा आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey Report) सादर करण्यात आला आहे. 

Mar 08, 2025 22:10 (IST)

रशियाचा युक्रेनवर हल्ला, 21 जणांचा मृत्यू

रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यात 21 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. एकीकडे रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याची चर्चा सुरू आहे. त्यात रशियाने हा हल्ला केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या युद्धाला पुर्णविराम मिळणार की नाही याची याबाबत जगाला चिंता लागली आहे.  

Mar 08, 2025 20:59 (IST)

कल्याण खडकपाडा बारावे परिसरात धक्कादायक घटना

कल्याण खडकपाडा बारावे  परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांसह मुलींचे फोटो काढत असल्याचा आरोप करत  एका तरुणाला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलीने फोटो काढत असल्याचा आरोप करत आरडा ओरड केल्याने ग्रामस्थांनी तरुणाला पकडले. त्यावेळी तरुणाच्या मोबाईल मध्ये अनेक महिला मुलींचे फोटो असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.  रुपेश कोयते असे तरुणाचे नाव आहे. 

Mar 08, 2025 18:15 (IST)

Kolhapur News: शक्तिपीठ महामार्गात 50 हजार कोटींचा घोळ, राजू शेट्टींचा आरोप

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गामध्ये 50 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप करून एकच गदारोळ उडवला आहे राजू शेट्टी हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, या दरम्यान त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकार या रस्त्याच्या माध्यमातून 50 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करत असून या पैशासाठीच हा महामार्ग पूर्ण करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप केला आहे आणि त्यामुळे आता नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे

Mar 08, 2025 18:14 (IST)

Daund News: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, दौंडमध्ये आंदोलन

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासोबतच धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी करावं या मागणीस्तव सकल मराठा समाजाच्या वतीने पुण्याच्या दौंड शहरात आंदोलन करण्यात आलय. परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागण्यांसह विविध मागण्यांचं निवेदन दौंड पोलिसांना देण्यात आले आहे.

Advertisement
Mar 08, 2025 18:12 (IST)

Latur News: विहिरीचे खोदकाम करताना मोठी दुर्घटना, जेसीबी खाली चिरडून एकाचा दुर्दैवी मृत्यू

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील नागलगाव शेत शिवारात विहिरीचे खोदकाम करीत असताना जेसीबी मालकांचा जेसीबीखाली सापडून दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे.. नागलगाव येथील शेतकरी रामचंद्र धोंडिबा जाधव यांच्या शेतात जेसीबीने विहिरीचे खोदकाम चालू असताना जेसीबीचे मालक माधव कांबळे वय 52 वर्ष राहणार खेर्डा ता उदगीर यांचा जेसीबीखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला, या घटनेची माहिती नागलगावचे पोलीस पाटील अंकुश वाघे यांनी ग्रामीण पोलिसांना दिली,

Mar 08, 2025 18:11 (IST)

Jalna News: खवल्या मांजराची तस्करी करणारी टोळी वन विभागाच्या जाळ्यात

जालना शहरात खवल्या मांजराची तस्करी करणारी टोळी वन विभागाच्या पथकांनी ताब्यात घेऊन त्यांच्या तावडीतून मांजराची सुटका केलीय.शहरात खवल्या मांजर घेऊन सहा जणांची टोळी ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने स्वतःहा ग्राहक होत सापळा रचून फिल्मी स्टाईल पाठलाग करून जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात सहा जणांना ताब्यात घेतले. 

Advertisement
Mar 08, 2025 18:10 (IST)

Daund News: दौंडमध्ये चारचाकी वाहनासह दुचाकींची तोडफोड, एकावर गुन्हा दाखल

दौंड तालुक्यातील खानोटा गावात रात्रीच्या सुमारास घरासमोर पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.यात एका चार चाकीसह दोन दुचाकींचा समावेश आहे. अनंत नामदेव खरसे यांच्या तक्रारीवरून दौंड पोलिसांनी शंकर नारायण पानसरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Mar 08, 2025 18:09 (IST)

Shirur News: सतीश भोसलेला अटक न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक, उद्या शिरुर बंदची हाक

शिरूर येथील सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्याप फरार आहे.. त्याला अटक न केल्याच्या निषेधार्थ शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे..  याबाबतचे निवेदन प्रशासनास देण्यात आले असून यामध्ये  या मागण्या करण्यात आल्या आहेत 

- सतीश भोसले उर्फ खोक्या व त्याचे सहकारी हरणाची तस्करी करणे व त्यातून भरपूर पैसे कमवणे हा मुख्य व्यवसाय करतात त्याकरिता त्याला वनविभागाचा व राजकीय वरदहस्त असून या सर्व प्रकरणाची चौकशी करावी तसेच वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.

- ढाकणे कुटुंबीयाला मारहाण झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक धोकरट यांनी ढाकणे कुटुंबाची तक्रार घेतली नाही..

- यामुळे ढाकणे कुटुंबाला पोलीस अधीक्षकांकडे जावे लागले परंतु त्या ठिकाणीही तक्रार घेतली नाही याबाबतची चौकशी करावी

- या सर्व घटना क्रमामध्ये ओबीसी समाजाच्या गरीब कुटुंबावर पोलीस प्रशासनाकडून अन्याय कोणाच्या दबावाखाली झाला याबाबतची चौकशी करावी 

- आमदार सुरेश धस आरोपीस वाचवण्यासाठी उघड सहकार्य करत असल्याचे दिसून येत असताना त्यांना सह आरोपी करावे 

यासह सतीश भोसले यांचे आणखी कुठले अवैध धंदे आहेत या सर्वांचा शोध घ्यावा या प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात येणार आहे..

दरम्यान आता या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात येणार आहे.

Advertisement
Mar 08, 2025 17:16 (IST)

Latur Accident: लातूरमध्ये भीषण अपघात, चालक जखमी

लातूरच्या उदगीर जळकोट रोडवरील पिंपरी जवळील घाटात कंटेनर व कारची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे,वलांडी येथील कीर्तनकार संगमेश्वर बिरादार वलांडीकर हे वलांडी येथून किर्तनासाठी तेलंगणा राज्यातील धोंडापूर येथे किर्तनासाठी जात असताना हा अपघात झाला,या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Mar 08, 2025 13:50 (IST)

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मेळाव्याला सुरुवात

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मेळाव्याला सुरुवात. खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक.  मेळाव्यात काही ठराव केले जाणार आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

Mar 08, 2025 12:52 (IST)

टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला, पुण्यातील सिंहगड रस्ता भागातील घटना

पुण्यातील सिंहगट रस्ता भागात किरकोळ वादातून टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला. कामावरून घरी निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्यावर टोळक्याने हल्ला केला. टोळक्याने कोयत्याने वार केल्याने तरुण जखमी झाला. या प्रकरणी रात्री सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दाम्पत्य सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. शुक्रवारी सायंकाळी दाम्पत्य दुचाकीवरून घरी निघाले होते. सिंहगड रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयाजवळ दुचाकीवरुन टोळके निघाले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून दाम्पत्याचा टोळक्याशी वाद झाला. यातून टोळक्याने दाम्पत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने दाम्पत्यावर कोयता उगारला. 

Mar 08, 2025 11:26 (IST)

समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ भीषण अपघात, 2 ठार, 4 जखमी

वर्ध्याहून शिर्डीकडे जाणाऱ्या क्रुझर जीपचे टायर फुटल्याने इर्टिका कारवर जाऊन अपघात झाला. समृद्धी महामृगावरील चॅनल क्रमांक 344 वर सिंदखेडराजा बुलढाणा हद्दीत ही घटना घडली. या अपघात टायर फुटल्याने क्रुझर जीप इर्टिका कारवरर जाऊन आदळली आणि उलटली. या भीषण अपघात 2 जण ठार तर 4 जण गंभीर जखमी तर 9 किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. गंभीर जखमी झाल्याने त्यांना सिंदखेडराजा राजा व जालना जिल्हा रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Mar 08, 2025 11:21 (IST)

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपींना फाशी देण्याची मागणी

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्रातील गावागावात आंदोलने केली जात आहेत. पुरंदर तालुक्यातील निरा गावात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला असून संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

Mar 08, 2025 11:11 (IST)

Pune News : पुणे जिल्‍ह्यात वीजबिलांचे 200 कोटी रुपये थकले

पुणे जिल्‍ह्यात वीजबिलांचे २०० कोटी थकले आहेत. वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने पुणे जिल्‍ह्यात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे १९९ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्‍यामुळे महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या ३५ दिवसांत ४२ हजार ७३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Mar 08, 2025 10:25 (IST)

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, सुरेश धस कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे तक्रार

- माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात ?

- कृषी विभागातील घोटाळ्याची ईडीकडे तक्रार 

- भाजप आमदार सुरेश धस ईडीला पत्र लिहून तक्रार करणार

- तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची 200 कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा धस यांचा दावा

Mar 08, 2025 10:23 (IST)

महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू

महादेव मुंडे खून प्रकरण अपडेट

महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू

16 महिन्यांपूर्वी मुंडे यांचा परळीत झाला होता खून अद्याप एकही आरोपी निष्पन्न नाही

पोलीस उपअधीक्षकांडे तपास देऊन देखील अद्याप आरोपी अटक नसल्याने सीआयडी कडे तपास देण्याच्या हालचाली सुरू आहेत

सूत्रांकडून याबाबत माहिती मिळते आहे

तर या प्रकरणाचा तपास आतापर्यंत तीन वेळा बदलण्यात आला आहे

पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकांकडून संशयतांची चौकशी देखील झाली आहे...

Mar 08, 2025 10:00 (IST)

सावधान! पुण्यात भेसळयुक्त पनीरचा मोठा साठा जप्त

पुणेकरांनो सावधान पुण्यात भेसळुक्त पनीरचा मोठा साठा जप्त

पुण्यात भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई 

कारवाईत १४०० किलो भेसळयुक्त पनीर पोलिसांनी केला जप्त 

भेसळयुक्त पनीरसह पोलिसांच्या छाप्यात पनीर बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चामाल आणि तेल देखील पोलिसांनी केलं जप्त 

पनीरचे सॅम्पल सॅम्पल साठी पाठवण्यात आले असून इतर साठा पोलिसांनी केला नष्ट 

पुण्यातील मांजरी खुर्द भागात एका खाजगी शेतामध्ये असणाऱ्या कारखान्यत गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त पनीरच करण्यात येत होतं उत्पादन 

कारवाईत पोलिसांकडून एकूण १३ लाखाचा मुद्देमाल जप्त

Mar 08, 2025 08:36 (IST)

पुणे शहरातील सराईत वाहन चोराला पोलिसांकडून बेड्या

पुणे शहरातील सराईत वाहन चोराला पोलिसांकडून बेड्या 

बिबवेवाडी पोलिसांची कारवाई 

वाहन चोरी प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराना अटक करत पोलिसांकडून अनेक दुचाक्या जप्त 

रविराज विलास माने अस अटक आरोपीचं नाव 

आरोपीच्या नावावर शहरातील इतर पोलीस स्टेशनमध्ये देखील वाहन चोरीचे गुन्हे 

Mar 08, 2025 08:33 (IST)

काँग्रेसची सद्भावना पदयात्रा आज बीडमध्ये होणार दाखल

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज 8 मार्च रोजी बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा काढली जाणार आहे.आज बीड जिल्ह्यात या यात्रेचे आगमन आज होणार असून दुपारी 4 वाजता ही यात्रा नारायण गडावर दाखल होणार आहे. नारायण गडाचे दर्शन घेतल्यानंतर ही यात्रा शिरूर कासार येथील शांतीवन - आर्वी या ठिकाणी मुक्कामी असेल.

 

सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन या पदयात्रेला सुरुवात होईल. 9 तारखेला ही पदयात्रा बीड शहरात पोहोचणार आहे. यावेळी महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून सद्भावना सभेने यात्रेचा समारोप केला जाईल. या सद्भावना यात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ असणार आहेत.

Mar 08, 2025 08:27 (IST)

वाशीम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दराने मोठी घसरण घेतली असून, मागील काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल ४,२०० रुपये मिळणाऱ्या सोयाबीनचा दर आता सरासरी ३,८०० रुपयांवर आला आहे. कमाल दरही चार हजार रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. मागील आठ वर्षांतील हा नीचांकी दर असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा आहे.

यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने सोयाबीन पिकवले, मात्र उत्पादन कमी आणि दरही तुटपुंजे मिळत असल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे. शासकीय खरेदी बंद झाल्याने खुल्या बाजारातील दर आणखी कोसळले आहेत. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन साठवलेले असून, त्यांना चांगल्या दराची प्रतीक्षा आहे.