
मेहबूब जमादार
वडापाव हा सर्वांनाच आवडणार पदार्थ आहे. कुठेही गेलं तर वडापाव कुणाला ही खावा वाटतो. स्वस्त आणि मस्त शिवाय कुठेही झटपट खाता येणारा हा पदार्थ. महाराष्ट्राच्या कुठल्या ही कानाकोपऱ्यात हा वडापाव मिळतो. प्रत्येक गावात, वाडीत वडापावची गाडी ही आलीच. मात्र जर तुम्ही वाडापाव प्रेमी असात तर ही बातमी नक्की वाचा. कारण वडापाव बाबत एक किळसवाणी आणि तेवढीच धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर इथं घडली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वच जण हादरले आहेत.
खालापूर तालुक्यातील मुंबई- पुणे जुन्या हाय-वेवर चौक गाव आहे. या गावातच उजाला नावाचे हॉटेल आहे. या गावातलं वडापावसाठी हे फेमस हॉटेल आहे. त्यामुळे ग्राहकांची इथं नेहमीच गर्दी असतो. पण इथं एका ग्राहकाने वडापाव खाण्यासाठी घेतला होता. पण त्याच वेळी त्याला वडापाव खाताना त्यामध्ये पाल आढळली. त्यांच्यासाठी तो धक्का होता. त्यानंतत संतप्त झालेल्या ग्राहकांना हॉटेल मालकाला याचा जाब विचारला. त्यामुळे वाद वाढत गेला.
नक्की वाचा - Dombivali News: ती रडत होती मात्र सांगू शकत नव्हती, जेव्हा खरं कारण समजलं तेव्हा...
चौक मधील उजाला हॉटेलमध्ये सोमवारी नाश्ता करण्यासाठी भरत वाघ हे गेले होते. त्यांनी वडापाव खाण्यास मागविला होता. या वेळी वडापाव खाताना भरत यांना तोंडात काहीतरी वेगळे जाणवले. त्यामुळे त्यांनी वडा कुस्करून पाहिला. त्यात त्यांनापूर्ण वाढ झालेली पाल मृतावस्थेत सापडली. या घटनेनंतर येथील ग्रामस्थानी हॉटेल मालकाला जाब विचारला. त्यावेळी हॉटेल मालकाने उडवाउडवीचे उत्तर दिली. ग्रामस्थांनी त्या हॉटेल मालकाला धारेवर धरले. झालेला प्रकरा गंभीर असल्याचं सांगितले.
दरम्यान, ही घटना चौक गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर जागरूक ग्रामस्थांनी हॉटेलमालकाला हॉटेल बंद करण्यास भाग पाडले. या अगोदर देखील चौक येथील हॉटेल मधील खाद्य पदार्थात झुरळ, किडे, पाली आढळल्या होत्या. परंतु अन्न व औषध प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. चौक येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी प्रशासनानेकडे आता या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. वडापावमध्ये पाल आढळणे म्हणजे ग्राहकांच्या जीवाशी खेळण्या सारखेच आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world