जाहिरात

Lohagad Fort Case: सिया आणि चेतनंचं CCTV फुटेज व्हायरल, पाहा कॅफेत कसं केलं केतनच्या हत्येचं प्लॅनिंग, VIDEO

 Ketan Agarwal Murder Case Pune: केतनची हत्या करण्यापूर्वी त्याची मुख्य आरोपी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरीची पुण्यातील एका कॅफेमध्ये भेट घेतली होती

Lohagad Fort Case: सिया आणि चेतनंचं  CCTV फुटेज व्हायरल, पाहा कॅफेत कसं केलं केतनच्या हत्येचं प्लॅनिंग, VIDEO
 Ketan Agarwal Murder Case Pune: सिया आणि चेतननं हत्येचं प्लॅनिंग एका कॅफेत केलं होतं.
पुणे:

 Ketan Agarwal Murder Case Pune: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एक मोठा खुलासा झाला आहे. केतनची हत्या करण्यापूर्वी त्याची मुख्य आरोपी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरीची पुण्यातील एका कॅफेमध्ये भेट घेतली होती. या भेटीदरम्यानच दोघांनी मिळून हत्येचा संपूर्ण कट रचल्याचे समोर आले आहे. या कॅफेमधील दोघांच्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या हाती आले असून, यामध्ये सिया आणि चेतन एकमेकांचा हात पकडून हत्येचे प्लॅनिंग करताना स्पष्ट दिसत आहेत. 

लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग दरम्यान केतनला दरीत ढकलून अपघाताचा बनाव रचण्याचा हा पूर्वनियोजित कट होता. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर अखेर त्यांनी केतनची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू केला असून, त्यात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

मोबाईल घरीच ठेवला

या संपूर्ण कटात आता पोलिसांचा संशय चेतन चौधरीचा जवळचा मित्र नीरज याच्यावर बळावला असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. तपासात समोर आले आहे की, गुन्ह्याच्या दिवशी आपली लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून चेतनने स्वतःचा मोबाईल फोन जाणीवपूर्वक घरीच ठेवून दिला होता. 

स्वतःचा फोन वापरण्याऐवजी त्याने मित्र नीरजचा फोन घेतला आणि त्याच मोबाईलवरून तो सतत सियाच्या संपर्कात होता. आता नीरज या संपूर्ण कटात थेट सामील होता की त्याला अंधारात ठेवून चेतनने त्याचा फोन वापरला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

( नक्की वाचा : Pune News: केतन अग्रवाल हत्याकांडावर आरोपी चेतन चौधरीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया; प्रकरणाला वेगळंच वळण )

लोहगड किल्ल्याचीच निवड का केली?

सियाने केतन अग्रवालच्या हत्येची योजना बऱ्याच दिवसांपूर्वीच आखली होती. केतनला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती आणि तो एक ट्रेकर होता. याच गोष्टीचा फायदा उठवत सियाने कटाचा एक भाग म्हणून लोहगड किल्ल्याची निवड केली. जेणेकरून तिथल्या उंच कड्यावरून केतनला खाली ढकलून देता येईल आणि पोलिसांना तसेच कुटुंबीयांना तो ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात वाटेल, अशी त्यांची योजना होती.

दोनदा झाला होता हत्येचा अयशस्वी प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतनने 31 मे रोजी पहिल्यांदा हत्येचा प्लॅन केला होता. त्यानंतर 14 जून रोजी केतनला कड्यावरून ढकलण्याचा पहिला प्रयत्न झाला, मात्र तिथे अचानक साप आल्यामुळे त्यांची योजना यशस्वी होऊ शकली नाही. यानंतर 18 जून रोजी दुसरा प्रयत्न करण्यात आला, ज्यामध्ये केतनला धक्का दिला गेला पण तो गंभीर जखमी झाला नाही. केतनने या दोन्ही घटनांना सियाची चूक किंवा निव्वळ अपघात समजून सोडून दिले होते. मात्र, अखेर 20 जून रोजी तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केली.

( नक्की वाचा : Lohagad Fort: नरबळी ते भुतांचा वावर, 2000 वर्ष जुना लोहगड किल्ला महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी किल्ला का आहे? )

दिवाळीच्या पार्टीत पहिली भेट

तपासादरम्यान सिया आणि चेतनच्या संबंधांबद्दलही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात एका पार्टीमध्ये या दोघांची पहिली भेट झाली होती. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि पुढे त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात सियाचे लग्न घरच्यांनी केतनसोबत ठरवले होते, ज्यामुळे सिया सातत्याने लग्न टाळण्याचा प्रयत्न करत होती. याच मानसिक दबावातून आणि प्रेमसंबंधांमुळे तिने आपल्याच मंगेतराच्या हत्येचा हा भयानक कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात डिजिटल पुरावे आणि कॉल रेकॉर्ड्स अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

पाहा संपूर्ण VIDEO
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com