भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार? लोकसभेतील पराभवाचा कुणाला फटका बसणार?

Political News : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सह प्रभारी यांची नियुक्ती केल्यानंतर आता राज्यातील भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

लोकसभा निवडणुकीत भाजपची राज्यातील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. राज्यात भाजपला एकूण 14 जागांचा फटका बसला. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे 23 खासदार निवडून आले होते. मात्र 2024 च्या निवडणुकीत हा आकडा 9 राहिला. भाजपच्या या अपयशाच्या पार्श्वभूमीवर पक्षात येत्या काळात मोठे बदल होण्याची दाच शक्यता आहे. 

(नक्की वाचा - लोकसभा पराभवानंतर भाजपचा अ‍ॅक्शन प्लान तयार, 'या' नेत्यांवर मोठी जबाबदारी)

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पक्षाचे नेते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांची महाराष्ट्रासाठी राज्य निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर आता राज्यातील भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कामगिरीचा प्रभारी आढावा घेणार आहेत. राज्यात अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपचे विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. 

लोकसभेतील पराभवानंतर भाजपने अॅक्शन प्लान तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे. महायुतीने गमावलेल्या 33 मतदारसंघांचा यानिमित्ताने आढावा घेतला जाणार आहे आणि त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे. 

(नक्की वाचा - शरद पवार की उद्धव ठाकरे, विधानसभेत कोण लढवणार पुण्यातील सर्वाधिक जागा?)

कोणत्या नेत्यांवर अहवाल तयार करण्याची जबाबदारी 

  • जालना - चंद्रकांत पाटील
  • रामटेक - खा. अनिल बोंडे
  • अमरावती - आशिष देशमुख
  • वर्धा - आ. प्रवीण दटके
  • भंडारा-गोंदिया - रणजीत पाटील
  • यवतमाळ-वाशिम - आ. आकाश फुंडकर, 
  • दिंडोरी - विजयाताई रहाटकर,
  • हिंगोली- आ. संजय कुटे, 
  • उत्तर-पश्चिम मुंबई - सुनील कर्जतकर,
  • दक्षिण मुंबई - माधवी नाईक, 
  • उत्तर-मध्य मुंबई- हर्षवर्धन पाटील,
  • उत्तर-पूर्व मुंबई - आ. राणा जगजितसिंह, 
  • मावळ - आ. प्रवीण दरेकर
  • अहमदनगर- खा. मेधा कुलकर्णी,
  • माढा - आ. अमित साटम, 
  • भिवंडी - गोपाळ शेट्टी
     
Topics mentioned in this article