जाहिरात

शरद पवार की उद्धव ठाकरे, विधानसभेत कोण लढवणार पुण्यातील सर्वाधिक जागा? 

पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री अशा अनेक निकषांवर पुणे शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आहे.

शरद पवार की उद्धव ठाकरे, विधानसभेत कोण लढवणार पुण्यातील सर्वाधिक जागा? 
पुणे:

पुण्याच्या आठ पैकी सहा विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे पार पडली. पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री अशा अनेक निकषांवर पुणे शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आहे. शहरातील हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट या सहा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हा अहवाल पाठवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याची भूमिका काल मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली. त्याच वेळी पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर पुणे शहरातील 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचाने दावा केला आहे.
 

बातमी अपडेट होत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com