जाहिरात

CNG-PNG Price Hike : सर्वसामान्यांना आणखी एक झटका; सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ

Inflation : महानगर गॅस लिमिटेड सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दीड रुपये प्रतिकिलो एवढी वाढ सीएनजीच्या दरात करण्यात आली आहे. 

CNG-PNG Price Hike : सर्वसामान्यांना आणखी एक झटका; सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ

CNG-PNG Price Hike : एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपये वाढ झाल्यानंतर आणखी एक धक्का नागरिकांना बसला आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेड सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दीड रुपये प्रतिकिलो एवढी वाढ सीएनजीच्या दरात करण्यात आली आहे. 

मुंबई आणि आसपासच्या परिसरात PNG च्या किमतीत 1 रुपये तर सीएनजीच्या दरात 1.50 रुपये वाढ करण्यात आली आहे. नवीन दर  8 एप्रिल 2025 च्या मध्यरात्रीपासून लागू होतील. नव्या दरानुसार पीएनजी 49 रुपये /SCM आणि सीएनजी 79.50 प्रति किलो असेल.

गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ

8 एप्रिल 2025 पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ सर्व ग्राहकांना म्हणजेच उज्ज्वला योजना आणि उज्ज्वला नसलेल्या ग्राहकांना लागू असेल. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) गरीब महिलांना स्वच्छ स्वयंपाक इंधन म्हणजेच LPG मिळावे म्हणून त्यांना मोफत गॅस कनेक्शन दिले जातात. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील गरीब महिलांना दिला जातो. आता, नवीन किमतींनुसार, उज्ज्वला योजना आणि इतर ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी 50 रुपये जास्त द्यावे लागतील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: